शिवसेनेला एकही जागा नाही.. बंडखोर नगरसेवकासह 300 पदाधिकाऱ्यांचा 'रामराम'

शिवसेनेला एकही जागा नाही.. बंडखोर नगरसेवकासह 300 पदाधिकाऱ्यांचा 'रामराम'

दबाव वाढवण्यासाठी भाजपचे नेते मुंबईला जाऊन उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करतात.

  • Share this:

वैभव सोनवणे,(प्रतिनिधी)

पुणे,16 ऑक्टोबर: पुण्यात शिवसेनेला एकाही जागेवर प्रतिनिधीत्व न मिळाल्याने कसब्यातून बंडखोरी केलेले नगरसेवक विशाल धनवडे यांनी 300 पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या विविध पदांचा राजीनामा दिला आहे. दबाव वाढवण्यासाठी भाजपचे नेते मुंबईला जाऊन उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करतात. त्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून शिवसेनेच्या कसबा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदांचा राजीनामा दिला आहे. सध्या विशाल धनावडे यांचा प्रचार करणार असून आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नाही, असेही विशाल धनवडे यांनी स्पष्ट केले आहे.

'ना'राजीनामा नाट्य, 350 पदाधिकारी, 36 नगरसेवकांचा 'जय महाराष्ट्र'

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्न करूनही, ते अपयशीच ठरले असंच म्हणावं लागेल. कारण आता कल्याणनंतर नाशिकमधलीही युती फिसकटली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघाची जागा भाजपला देण्यात आल्यानं शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त थेट बंडखोरीचंच हत्यार उपसले. भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात उभे ठाकलेले शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांचा प्रचार शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी उघडपणे करत आहेत. यानंतर मंगळवारी (15 ऑक्टोबर) जवळपास 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांनी विलास शिंदे यांनी जाहीर समर्थन दर्शवत सामूहिक राजीनामे दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नाशिक पश्चिम मतदारसंघात युतीत फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील कलह वाढत आहे.

यापूर्वी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातही महायुतीत फूट पडली. शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 18 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. आमच्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये, अशी राजीनामा दिलेल्या नगरसेवकांचं म्हणणं होतं. दरम्यान, कल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण पूर्व मतदार संघ भाजपला सोडल्याने शिवसेनेचे स्थानिक नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले होते. या मतदार संघातून उल्हासनगर महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

पुणेकर घर शोधण्यासाठी मदत करा...

दुसरीकडे, मी आता पुण्यात राहायला आलो असल्याने मला पुणेकरांनी घर शोधण्यासाठी मदत करावी, असे मजेशीर उत्तर चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड निवडणुकीतील आतला बाहेरचा वादावर दिले आहे. विरोधक त्यांच्यावर आयात उमेदवार म्हणून आरोप करत आहेत. आज पुण्यात त्यांच्याहस्ते कोथरूड संकल्पनामाचे प्रकाशन करण्यात आले. गडकरी पुतळा वादावरही अधिकचे भाष्य करणे त्यांनी टाळले. काही विषय संवेदनशील असतात, अशा वादाच्या विषयांवर नंतरच बोलू असे ते म्हणाले.

VIDEO:स्वत:चं ठेवायचं झाकून अन्..,अजितदादांचा भाजपला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 05:21 PM IST

ताज्या बातम्या