पुण्यात या 4 जागांवर शिवसेनेचा डोळा.. शहर प्रमुखपदी या नेत्याची लागली वर्णी

पुण्यात या 4 जागांवर शिवसेनेचा डोळा.. शहर प्रमुखपदी या नेत्याची लागली वर्णी

पुण्यात 3 महिन्यापासून रिक्त असलेल्या शिवसेना शहर प्रमुखपदी यांची वर्णी लागली आहे. शहर प्रमुखपदी नियुक्ती होताच संजय मोरे यांनी 8 पैकी 4 जागा शिवसेनेला द्या, अशी मागणी केली आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता,(प्रतिनिधी)

पुणे, 18 सप्टेंबर: पुण्यात 3 महिन्यापासून रिक्त असलेल्या शिवसेना शहर प्रमुखपदी यांची वर्णी लागली आहे. शहर प्रमुखपदी नियुक्ती होताच संजय मोरे यांनी 8 पैकी 4 जागा शिवसेनेला द्या, अशी मागणी केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही, याबद्दल साशंकता असताना कसबा मतदारसंघात तर सेनेच्या इच्छुक उमेदवाराने प्रचारालाही सुरुवात केली आहे.

या दोघांना दिला डच्चू..

एकीकडे शिवसेनेने पुण्यातील दोन्ही शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांना पदावरून डच्चू दिला होता तर दुसरीकडे भाजपने माधुरी मिसाळ यांची शहर अध्यक्षपदी निवड करून पुण्यात आठही आमदार भाजपचे असल्याने 8 ही जागा भाजप लढवेल, असे सांगत सेनेवर कुरघोडी केली आहे.

तर बॅकफूटवर गेलेल्या सेनेत मरगळ आली होती. विनायक निम्हणही सक्रिय राजकारणापासून 4 हात लांब गेले, मात्र आता संजय मोरे यांची शहर अध्यक्षपदी निवड करून सेनाही मैदानात उतरली आहे.

8 मतदार संघातील 20 इच्छुकांच्या मुलाखती..

पुण्यात 8 मतदार संघातील 20 इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत झाल्या. आम्ही समसमान म्हणजे 4 जागांवर ठाम आहोत, असे नवनियुक्त शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगिले आहे. 2009 मध्ये पुण्यात विधानसभेच्या जागा होत्या तेव्हा सेनेचे कोथरूडमधून चंद्रकांत मोकाटे आणि हडपसरमधून महादेव बाबर हे युतीतर्फे निवडून येऊन आमदार झाले होते. 2014 मध्ये 6 चे 8 मतदारसंघ झाले. पण युती तुटली होती. मोदी लाटेत 8 च्या 8 जागांवर भाजपचे आमदार निवडून आले. यावेळी युतीची चर्चा आहे.

या 4 जागांवर शिवसेनेचा डोळा...

कोथरूड, हडपसर, वडगावशेरी, शिवाजीनगर या 4 मतदार संघावर सेनेचा डोळा आहे. निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गेही सेनेकडून पुण्यात आखाड्यात उतरण्यास इच्छुक आहेत.

भाजपचा बालेकिल्ल्या असलेल्या कसब्यात तर विशाल धनवडे यांनी प्रचाराचा नारळ ही फोडला आहे. शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांची जन्मभूमी असलेल्या पुण्यात शिवसेनेची ताकद आहे. मात्र भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे आणि सेनेतील अंतर्गत दुफळीमुळे ती क्षीण झाली. त्याचं प्रतिबिंब महापालिका निवडणुकीतही उमटले आहेच. मोदी यांचं हिंदुत्ववादी राजकारण याचा फायदा सेनेला होऊ शकतो, मात्र युती होणार का आणि झाली तरी किती जागा पदरात पडणार यावर सेनेची गणिते अवलंबून आहेत.

नाणारवरून शिवसेनेचा U टर्न? आदित्य ठाकरेंचं स्वागतासंदर्भात सूतोवाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 09:28 PM IST

ताज्या बातम्या