पुण्यात राष्ट्रवादीला धक्का.. या नेत्याने घेतली माघार, भाजपला दिला पाठिंबा

पुण्यात राष्ट्रवादीला धक्का.. या नेत्याने घेतली माघार, भाजपला दिला पाठिंबा

ऐन विधाससभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता,(प्रतिनिधी)

पुणे, 7 ऑक्टोबर: ऐन विधाससभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रदीप कंद यांनी शिरूर मतहारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे प्रदीप कंद यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.

सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रदीप कंद यांनी आपला अर्ज मागे घेऊन भाजपचे उमेदवार बाबुराव पाचार्णे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रदीप कंद हे शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार होते. भारतीय जनता पक्षाला त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

प्रदीप कंद यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत कंद यांनी आपला मनोदय बोलून दाखवला होता. महाराष्ट्रात देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आपण पाठिंबा देत आहोत. शिरूरमधून भाजपाचे उमेदवार बाबूराव पाचार्णे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी आपण संपूर्ण ताकद पणाला लावू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

प्रदीप कंद यांच्यात धडाडी आहे, भाजप त्यांचा योग्य तो सन्मान नक्की ठेवेल, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करून प्रदीप कंद भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आमदार राहूल कुल, भाजपचे पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर या वेळी उपस्थित होते.

VIDEO :..आणि चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, मेधा कुलकर्णींबद्दल केला मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 05:16 PM IST

ताज्या बातम्या