शरद पवारांच्या टीकेनंतर पुण्यात या नेत्याने घेतला राजकीय संन्यास

सध्या असे राजकारण मावळमध्ये सुरू असल्यामुळे या पुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नसल्याचे बाळासाहेब नेवाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2019 06:31 PM IST

शरद पवारांच्या टीकेनंतर पुण्यात या नेत्याने घेतला राजकीय संन्यास

अनिस शेख,(प्रतिनिधी)

मावळ,12 ऑक्टोबर: तळेगाव येथे झालेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या सभेवर इच्छुक उमेदवार बाळासाहेब नेवाळे यांनी घणाघाती टीका केली होती. त्याचे पडसाद आता पाहायला मिळत आहे. मावळमध्ये बाळासाहेब नेवाळे यांनी राजकीय संन्यास घेतल्याचे जाहीर केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये कोणताही सहभाग घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवारांनी बाळासाहेब नेवाळे यांच्यावर भरसभेत घणाघाती टीका केली. भर सभेत पवारांनी नेवाळे यांना अध्यक्ष पद दिले, चेअरमन पद दिले तरी ही राष्ट्रवादीने काय दिले असं म्हणता अजून काय देऊ? असं म्हणत बाळासाहेब नेवाळे यांच्यावर निशाणा साधला होता.

सध्याचे राजकारण पैसा घेऊन येणे आणि निवडून आले की मग पैसा कमवायचे, अशा प्रकारचे आहे. सध्या असे राजकारण मावळमध्ये सुरू असल्यामुळे या पुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नसल्याचे बाळासाहेब नेवाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

बाळासाहेब नेवाळे हे गेले गेली पंचवीय वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत होते. जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच अनेक संस्थांचे चेअरमनपद त्यांनी भूषवले आहे. नेवाळे यांनी आज सर्व पदांचे राजीनामे दिले असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी पक्ष हा डबघाईला आला आहे. आज मावळमधील दिलेला उमेदवार हा भारतीय जनता पक्षाकडून आयात करण्यात आला असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी मांडली. नेवाळे सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक असून त्यांनी शरद पवारांच्या टीकेनंतर या दोन्ही पदांचा राजीनामा दिला असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. सध्या महाराष्ट्रातून सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे मावळमधील राष्ट्रवादी व भाजपमधील अटीतटीच्या सामना आहे. या मध्येच ऐनवेळी नेवाळे यांच्या राजीनाम्याने मावळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Loading...

VIDEO: झुणका भाकर केंद्राच्या जमिनीचं काय झालं? आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...