MIM ने पुणे, सोलापुरात दिले हे उमेदवार, खुनातील आरोपीचा पत्ता केला कट

MIM ने पुणे, सोलापुरात दिले हे उमेदवार, खुनातील आरोपीचा पत्ता केला कट

  • Share this:

सागर सुरवसे,(प्रतिनिधी)

सोलापूर,2 सप्टेंबर: एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेत विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील 3 उमेदवार जाहीर केले आहेत. खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एमआयएम शहराध्यक्ष तौफिक शेखचा याचा पत्ता कट करून त्याच्या पत्नी सुफिया तौफिक शेख यांना सोलापूर दक्षिणमधून उमेदवारी देण्यात आली आहे. कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात स्वच्छ प्रतिमेच्या फारुख शाब्दींना सोलापूर मध्यमधून तर सांगोल्यातून धनगर समाजाचे कार्यकर्ते ॲड. शंकर सलगर यांना उमेदवारी दिली आहे. एमआयएमने धनगर समाजाला उमेदवारी दिल्याने शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पुणे कँटोनमेंट हा मतदार संघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदार संघातून हीना शफिक मोमीन यांना उमेदवारी देण्यात आल्याचे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या संमतीने ही उमेदवार यादी जाहीर करत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.

..तर अशी लढत होईल

पुणे कँटोनमेंट – दिलीप कांबळे (भाजप) vs हीना शफिक मोमीन (एमआयएम)

सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे (काँग्रेस) vs फारुक मकबूल शब्दी (एमआयएम)

सोलापूर शहर दक्षिण – सुभाष देशमुख (भाजप) vs सुफिया तौफिक शेख (एमआयएम)

सांगोला – गणपतराव देशमुख (शेकाप) vs अॅड. शंकर भगवान सरगर (एमआयएम)

दरम्यान, सोलापूर मध्य मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात 'आप'ने आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याची घोषणा केली आहे. मुस्मिल बहुल असलेल्या या मतदारसंघात 'आप'ने अॅडव्होकेट खतीब यांना उमेदवारी निश्चित केली आहे. एमआयएमकडून फारुक शाब्दी रिंगणात उतरत आहेत. सोलापूर दक्षिणमधून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात सुफिया तौफिक शेख मैदानात असतील. तब्बव 11 वेळा निवडून आलेले शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांच्याविरोधात अॅड. शंकर भगवान सरगर निवडणुकीला उतरणार आहेत.

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 08:15 PM IST

ताज्या बातम्या