..यामुळे राज ठाकरेंच्या मनसेने केला पुण्यात भररस्त्यावर सभा घेण्याचा निर्धार

राज यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर 'कुणी जागा देता का जागा' असे म्हणायची वेळ आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2019 07:53 PM IST

..यामुळे राज ठाकरेंच्या मनसेने केला पुण्यात भररस्त्यावर सभा घेण्याचा निर्धार

अद्वैत मेहता,(प्रतिनिधी)

पुणे,6 ऑक्टोबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पुण्यात फोडणार आहेत. परंतु, मनसेला सभा घ्यायला पुण्यात मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे मनसेने टिळक रोडवरीस अलका चौकात भररस्त्यावर सभा घेण्याचा निर्धार केली आहे. मात्र रस्त्यात किंवा भरचौकात सभा घेता येत नाही, असा नियम असल्याने मनसे काय करते, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांची मुलूख मैदानी तोफ 9 ऑक्टोबरपासून धडाडणार आहे. कोथरुडमध्ये तर मनसेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने पाठिंबा दिल्याने वेगळा पॅटर्न उदयास आला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडिओ'च्या उपक्रमानंतर आता राज ठाकरे विधाननसभेच्या प्रचारसभेत कोणता नवा प्रयोग करणार, याची उत्सुकता लागला आहे. मात्र,राज यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर 'कुणी जागा देता का जागा' असे म्हणायची वेळ आली आहे. मनसेला सभा घेण्यासाठी न्यू इंग्लिश रमणबाग शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, सरस्वती शाळा चालकांनी असमर्थता व्यक्त केली आहे. या संस्था सत्ताधारी भाजपशी संबंधित असल्याने ही दडपशाही आहे, असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केला आहे.

अजय शिंदे हे कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन राज ठाकरे हे प्रचाराचा नारळ फोडणार आहे. त्यात सभेला जागा न मिळाल्याने टिळक चौक अर्थात अलका चौकात सभा होईल, असे मसनेचे घोषित केले आहे. राज ठाकरे यांची 9 ऑक्टोबरला पुण्यात पहिली सभा होणार आहे. तसेच कोथरुड आणि हडपसर मतदारसंघाततील उमेदवारांच्या प्रचारासाठीही राज सभा घेणार असल्याची माहिती मसनेच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र,सभा घ्यायच्या कुठे हा प्रश्न पुण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे.

5 वर्षांच्या मुलीची छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 07:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...