'डिजिटल इंडिया'त चिखलाचे साम्राज्य असलेल्या रस्त्यावरून EVM चा बैलगाडीतून प्रवास

'डिजिटल इंडिया'त चिखलाचे साम्राज्य असलेल्या रस्त्यावरून EVM चा बैलगाडीतून प्रवास

मतदानाच्या पूर्वसंध्येला 'डिजिटल' समजलेल्या इंडियातील एक वास्तव समोर...

  • Share this:

रायचंद शिंदे,(प्रतिनिधी)

शिरूर, 20 ऑक्टोबर: राज्यभरात उद्या (21 ऑक्टोबर) लोकशाहीचा उत्सव अर्थात विधानसभा निवडणूक होत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला 'डिजिटल' समजलेल्या इंडियातील एक वास्तव समोर आले आहे. चिखलाचे साम्राज्य असलेल्या रस्त्यावरून मतदान यंत्र अर्थात EVM चक्क बैलगाडीतूनच न्यावे लागले आहे.

धक्कादायक म्हणजे हा काही आदिवासी किंवा डोंगराळ भाग नसून पुणे जिल्ह्यातील विकसित समजल्या जाणाऱ्या शिरूर तालुका आहे.तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील तांबूळ ओढा आणि दराखे वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही. रस्तावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य आहे. रविवारी 173 बुथ क्रमांक असलेल्या या मतदान केंद्रावर जाण्यासाठी अधिकाऱ्यांना चक्क बैलगाडीचा वापर करावा लागला. या रस्ताबाबतीत नागरीकांनी वेळोवेळी तक्रारी देखील केल्या होत्या. या रस्तासंदर्भात स्थानिक नागरीकांनी गेले 7 ते 8 वर्षे, शिरूर तहसील कार्यालयात आणि तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिले असून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. याठिकाणी शाळा आहे. लहान मुलांना व ग्रामस्थांना येण्याजाण्यासाठी खूप त्रास होत आहे. आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागते, असेही स्थानिक नागरिक सांगत आहेत.

दरम्यान, शिरुर मतदार संघात मागील 7 वर्षांपासून बैलगाडी शर्यती उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद आहेत. आज त्याच बैलगाडीचा वापर मतदान यंत्र अर्थात EVM घेऊन जाण्यासाठी करावा लागला.

VIDEO:परळीपासून ते वरळी 'या' आहे राज्यातील बिग फाईट्स, कोण मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 09:54 PM IST

ताज्या बातम्या