राज यांच्या 'प्रबळ विरोधी पक्ष बनवा', या विधानाचे काँग्रेस नेत्याकडून स्वागत

राज यांच्या 'प्रबळ विरोधी पक्ष बनवा', या विधानाचे काँग्रेस नेत्याकडून स्वागत

राज्यात 288 जागा एकटे भाजप लढवत नाही आहे. आम्हीही मैदानात आहोत...

  • Share this:

पुणे, 12 ऑक्टोबर: मनसे राज ठाकरे यांच्या सध्या राज्यभर प्रचारसभा सुरू आहेत. मनसेला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मते द्या, या विधानाचे स्वागतच करायला हवे, असे मत काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी व्यक्त केले आहे. पण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळून सत्ता मिळेल, असा दावा विश्वजित कदम यांनी केला आहे.

समोर लढायला कुणी नाही, असे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. राज्यात 288 जागा एकटे भाजप लढवत नाही आहे. आम्हीही मैदानात आहोत, असा टोलाही विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

राहुल गांधींचा प्रचारदौरा 13 ऑक्टोबरपासून...

काँग्रेस राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील प्रचार दौरा रविवार, 13 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन।पायलट हेही महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. राज्याच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठीच भाजपकडून 370 सारखे मुद्दे आणले जातात. मात्र, देशातील जनता आमच्यासोबत असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले आहे.

..तर सहा विद्यार्थ्यांना केले निलंबित

Loading...

काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत यांनी मंत्रालयात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. देशातल्या मॉब लिंचिंग व इतर विषयांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले म्हणून खटला दाखल करण्यात आला आहे. आता देशातील सध्याची स्थिती व इतर सामाजिक मुद्यांवर मोदी यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या या कारवाईमुळे सगळ्यांचे याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. या विद्यार्थ्यांनी निवडणूक आचारसंहिता भंग केली म्हणून त्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावर निषेध उपस्थित करत विद्यापीठाला निवडणूक आयोगाने योग्य आचारसंहिता कशी असावी व आदर्श आचारसंहिता लागू करण्याचे काम व अधिकार हे आता आऊटसोर्स केले आहे का? असा पश्न निवडणूक आयोगाकडे सचिन सावंत यांनी उपस्थित केला.

VIDEO: PMC चे खातेदार 'राज'दरबारी, बैठकीबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...