पुण्यात BJP vs BJP:गणपतीच्या आरतीनंतर अंगावर पाणी उडाल्याने पेटला वादंग

पुण्यात BJP vs BJP:गणपतीच्या आरतीनंतर अंगावर पाणी उडाल्याने पेटला वादंग

विधानसभा निवडणुकीच्या आधीच मावळ तालुक्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. विधानसभेसाठी भाजपकडून इच्छूक असणारे तळेगावचे नगरसेवक सुनील शेळकेच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे.

  • Share this:

अंनिस शेख, (प्रतिनिधी)

मावळ, 6 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीच्या आधीच मावळ तालुक्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. विधानसभेसाठी भाजपकडून इच्छूक असणारे तळेगावचे नगरसेवक सुनील शेळकेच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. कल्पेश मराठे असे मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नातेवाईक तसेच कार्यकर्त्यांनी कल्पेशला मारहाण करून जखमी केल्याची तक्रार तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. तसेच विरुद्ध तक्रारीत प्रतिक भेगडे याला कल्पेश मराठेकडून मारहाण झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

गणपतीच्या आरतीनंतर अंगावर पाणी उडाल्याने पेटला वादंग...

गणेश मंडळाच्या ठिकाणी आरती करताना अंगावर पाणी उडाल्याने हे वादंग पेटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या घटनेचे रूपांतर मोठ्या मारहाणीत झाल्याचा प्रकार तळेगाव येथे घडला. या हाणामारीत कल्पेश मराठे या तरुणाच्या हात, पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण करणारे राज्यमंत्री बाळा भेगडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप जखमी कल्पेश मराठे याने केला आहे. बाळा भेगडे यांनी नातेवाईक तसेच कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे कबूल केले. परंतु या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग न देता पोलिसांनी संपूर्ण घटनेची शहानिशा करून योग्यप्रकारे गुन्ह्याचा तपास करण्याचे, आवाहन पोलिस प्रशासनाला केले आहे.

एमआयडीसी पोलिसांकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक भेगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कल्पेश मराठे यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा. तसेच गुन्हा दाखल करणारे पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी सुनील शेळके यांनी केली आहे संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या आवारात आंदोलन केले. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यकर्त्यावर झालेले अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा नगरसेवक सुनील शेळके यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर दाखल होत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या दोषींवर योग्य त्या कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

VIDEO: 'औरंगजेबाला जमलं नाही ते सरकारनं 5 वर्षांत केलं', 'या' निर्णयावर भडकले अमोल कोल्हे

Published by: Sandip Parolekar
First published: September 6, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या