मी पुन्हा येईन.. या राज्यमंत्र्यांने पत्रकार परिषदेत वाचला विकास कामांचा पाढा!

मी पुन्हा येईन.. या राज्यमंत्र्यांने पत्रकार परिषदेत वाचला विकास कामांचा पाढा!

मी पुन्हा येईन.. असे सांगत मावळचे आमदार आणि महाराष्ट्राचे पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत चक्क मागील दहा वर्षांत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला.

  • Share this:

अंनिस शेख,(प्रतिनिधी)

वडगाव, 20 सप्टेंबर: मी पुन्हा येईन.. असे सांगत मावळचे आमदार आणि महाराष्ट्राचे पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत चक्क मागील दहा वर्षांत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला. वडगाव येथील पंचायत समिती कार्यालयात राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या कार्यकाळात कोट्यवधींची विकास कामे केल्याचा दावा भेगडे यांनी यावेळी केला.

दरम्यान दोन महिन्यांत मतदारांनी जनकौल मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला देऊन देशाची सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देऊन 'नवभारत' निर्माण करण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे 'मी पुन्हा येईन' या विश्वासाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकास करणारे सरकार राज्यात पुन्हा येईल, असा विश्वासही राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मावळ तालुक्यात मी जनतेचे विश्वास संपादित केला असल्याने मी पुन्हा येईल, असे सूचक वाक्तव्य करत बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातून तिसर्‍यांदा रणशिंग फुकंत भाजपचा उमेदवार म्हणून स्वतःला घोषित केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्यातून सुनील शेळके तसेच रवींद्र भेगडे हे भाजपचे दोन बलाढ्य इच्छुक उमेदवार पुढे आल्याने राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पुढे मोठी अडचणी निर्माण झाली आहे. येणाऱ्या दिवसांत पक्षश्रेष्ठींकडून तालुक्याची उमेदवारी नेमकी कोणाला मिळते, तसेच बाळा भेगडे यांना पक्षाने उमेदवारी दिलीच तर ते यांची आमदारकीची हॅट्रिक पूर्ण होते का, हे पाहणे महत्त्वाचा ठरणार आहे.

VIDEO:युतीचा फॉर्म्युला अजून हवेतच? चंद्रकांत पाटील म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 06:18 PM IST

ताज्या बातम्या