पुण्यात वाद.. कानशिलात भडकावणे, डोके फोडण्यापर्यंत भिडले भाजप कार्यकर्ते

एकमेकांचे मोबाइल फोडणे, कानशिलात मारणे, डोके फोडणे इथपर्यंत कार्यकर्ते भिडले. वादानंतर दोन्ही बाजूंनी शांत राहणेच पसंत केले.

News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2019 09:40 AM IST

पुण्यात वाद.. कानशिलात भडकावणे, डोके फोडण्यापर्यंत भिडले भाजप कार्यकर्ते

अद्वैत मेहता,(प्रतिनिधी)

पुणे, 14 सप्टेंबर:पुण्यात मेहेंदळे गॅरेज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेचे होर्डिंग लावण्याच्या वादातून कोथरूडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी आणि तिकिटासाठी इच्छुक नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यात चांगलीच जुंपली. कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांचे मोबाइल फोडणे, कानशिलात मारणे, डोके फोडणे इथपर्यंत कार्यकर्ते भिडले. वादानंतर दोन्ही बाजूंनी शांत राहणेच पसंत केले. पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही.

याबाबत आमदार मेधा कुलकर्णी यांनी 'कार्यकर्त्यांचा जीव होर्डिंगपेक्षा मोलाचा असून चूक नसतानाही आम्ही समंजणपणे प्रकरण हाताळले. ही घटना पक्षातील वरिष्ठांना कळवली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसरीकडे, मोहोळ म्हणाले की, परवानगीनेच होर्डिंग लावले होते. मात्र, दादागिरी करून त्यावर आमदार कुलकर्णींचे होर्डिंग लावले गेले. तरीही आम्हीच शांत बसलो,अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज, 14 सप्टेंबरला पुण्यात दाखल होत आहे. संध्याकाळी मुख्यमंत्री फडणवीस खास बस मधून पूर्ण शहरातून फिरणार आहेत. पुण्यात सर्वच्या सर्व 8 ही आमदार भाजपचे आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर फ्लेक्स आणि बॅनरमय झाले आहे.

विशेष म्हणजे अनधिकृत, बेकायदेशीर फ्लेक्सची बजबजपुरी माजली आहेच त्याशिवाय अधिकृत होर्डिंग्जवर ही भाजप आमदारांनी काही ठिकाणी गोड बोलून तर काही ठिकाणी जोर जबरदस्तीने अतिक्रमण केले आहे. होर्डिंग लावण्याच्या वादातून कोथरूडच्या भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि कोथरूडमधून भाजपचेच इच्छुक उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली. मुख्यमंत्री येतायत त्यांच्या समोर शोभा नको म्हणून प्रकरण पोलिसांत गेले नाही.मोबाईल फोडणे, कानशिलात मारणे, डोके फोडणे इथपर्यंत कार्यकर्ते भिडले. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये आता तिकिटवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावून व्यापापीवर्ग खूशामत केली जात आहे. एकीकडे होंर्डिंग, फ्लेक्समुळे शहर विद्रुप दिसत आहे तर दुसरीकडे फ्लेक्सवरून भाजप अंतर्गत वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. होंर्डिंग, फ्लेक्स वॉर रंगल्याने विधानसभेची रंगीत तालीम सुरू आहे.

Loading...

VIDEO: प्रकाश आंबेडकरांकडून केंद्र सरकारला दारूड्याची उपमा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 09:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...