चंद्रकांत पाटलांचे कोथरुडमधील विघ्न दूर, ब्राह्मण महासंघाने दिला पाठिंबा

चंद्रकांत पाटलांचे कोथरुडमधील विघ्न दूर, ब्राह्मण महासंघाने दिला पाठिंबा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

  • Share this:

पुणे,5 ऑक्टोबर: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत दादा पाटील यांची शनिवारी पुण्यात बैठक झाली. त्यात ब्राह्मण समाजाच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून आगामी सरकारच्या माध्यमातून त्या तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. परिणामी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. चंद्रकांत पाटलांचे कोथरुडमधील विघ्न दूर झाली आहे.

महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. मोहिनी पत्की, पुणे जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्ष यांच्यासह जितेंद्र कुलकर्णी, प्रवक्ते आनंद दवे आदींच्या स्वाक्षरीने चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अधिकृत पत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत शनिवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ब्राह्मण समाजाचे आर्थिक विकास महामंडळ, विद्यार्थ्यांचे प्रश्न आदींबाबत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्राधान्याने सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.

ब्राह्मण समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहता आणि राज्याच्या व्यापक हिताच्या दृष्टीकोनातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातील चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीस ब्राह्मण महासंघातर्फे पूर्ण पाठिंबा देण्यात येत आहे, असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.

...अन् अजित पवारांनी जिवंत माणसालाच वाहिली श्रद्धांजली, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 06:10 PM IST

ताज्या बातम्या