मतदान करा: 'मिसळी'वर ताव मारा आणि 'हेअर कट'ही करा अगदी मोफत

मतदान करा: 'मिसळी'वर ताव मारा आणि 'हेअर कट'ही करा अगदी मोफत

जास्त मतदान व्हावं यासाठी अनोखी शक्कल लोकांनी शोधून काढलीय. कुणी मिसळ मोफत देतोय तर कुणी दाढी-कटींग मोफत करतोय.

  • Share this:

मुंबई 21 ऑक्टोंबर : मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडावं यासाठी सरकार आणि निवडणूक आयोग कायम प्रयत्न करत असतात. तरीही मतदानाचं प्रमाण हे फार जास्त होत नाही. सरकारच्या जनजागृती मोहिमेत आता जनताही सहभागी होतेय. व्यावसायिकांनी या अनोखी शक्कल शोधून काढलीय. कुणी कडक मिसळ मोफत देतोय, कुणी एकावर एक फ्री तर कुणी दाढी- कटिंगही मोफत करून देतोय. मतदान केल्याचं दाखवा आणि कडक मिसळीवर मनसोक्त ताव मारा असं आव्हान या मंडळींनी मतदारांना केलंय. यात सर्वात आघाडीवर आहे ते पुणे. पुण्यातल्या जशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत तशीच प्रसिद्ध आहे ती मिसळ. मिसळीचे अनेक प्रकार पुण्यात बघायला मिळतात.

मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर कॉन्फिडन्स - उदयनराजे भोसले

त्यामुळे अनेक मिसळवाल्यांनी मतदान केल्याचं दाखवा आणि मिसळ खा असं सांगितलंय. तर अनेकांनी एकावर एक फ्री मिसळ देण्याचं आश्वासन दिलंय. पुण्याबरोबरच मुंबई, नाशिक आणि कोल्हापुरातल्याही काही मिसळवाल्यांनी मिसळीवर ताव मारण्यासाठी मतदारांना बोलावलंय. तर नाशिकमध्ये काही सलूनवाल्यांनी मतदान करून या आणि दाढी कटींग मोफत करा असं मतदारांना सांगितलंय.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 मुंबईकरांचा मृत्यू

मतदान करताना या गोष्टींची काळजी घ्या

1. सोमवारी  मतदानासाठी बाहेर पडताना  स्वतःचा मोबाईल घेऊन  जाऊ नका.

2. मतदान बुथमध्ये मोबाईल नेण्यासाठी बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत घेऊ नये. त्यामुळे वेळ वाचेल.

3. मतदानाला जाण्याआधी आयोगाच्या APP वर आपले नाव आणि मतदान केंद्र आधीच जाणून घ्या. त्यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल.

4. मतदान केंद्राबाहेरही मतदतीसाठी अनेक केंद्र उपलब्ध असतात. त्या ठिकाणाहूनही तुम्हाला माहिती मिळू शकते.

मतदानासाठी जाताना या 7 गोष्टी लक्षात असू द्या

5.मतदान करताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (7 सेकंद)  बटण दाबून ठेवा. बीप असा आवाज येईल. त्यानंतरच तिथून बाहेर पडा.

6. EVM मशीनवर बटण दाबताना लक्षात ठेवा की VVPAT मधून स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरचं बोट काढू नका.

7. VVPAT स्लिपसह आपलं टाकलेलं मत त्याच उमेदवाराला पडलेलं आहे की नाही याची खात्री करा.

8. काही तक्रार असल्यास संबंधीत केंद्र अधिकाऱ्याकडे तुम्ही तुमची तक्रार किंवा सूचना नोंदवू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 08:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading