Home /News /pune /

अंनिसच्या अध्यक्षपदावरुन वाद, एन डी पाटलांच्या निधनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर

अंनिसच्या अध्यक्षपदावरुन वाद, एन डी पाटलांच्या निधनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर

mukta dabholkar

mukta dabholkar

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर(narendra dabholkar) यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीमधला वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

    पुणे, 29 जानेवारी: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर(narendra dabholkar) यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीमधला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. संघटनेचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांच्या निधनानंतर नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद आणि मुलगी मुक्ता यांनी 7 कोटींचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे. एन डी पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते.  त्यांच्या जागेवर एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर  गटाने घेतला.  मात्र अविनाश पाटील यांनी याला आक्षेप घेतला आहे. अविनाश पाटील यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून संघटनेची बाजू मांडली आहे. या पोस्टमध्ये अविनाश पाटील यांनी मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांच्या गटावर गंभीर आरोप केले आहेत. “समितीच्या कामाशी संबंध नसताना अशी निवड जाहीर करण्याचा हा खोडसाळपणा म्हणजे सार्वजनिक जीवनात संभम निर्माण करुन फसवणूक करणे आहे. नागरिक, प्रसार माध्यमे आणि समविचारी संस्था, संघटना, कार्यकर्ते यांची ही दिशाभूल आहे. वारसा हक्क आणि घराणेशाहीने एकूणच पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे. संत, समाज सुधारकांची जाज्वल्य परंपरा असलेला महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार वारसा घेऊन आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या 60 वर्षातील सर्वांगिण विकासाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या परिवर्तनशील चळवळींनी आपल्या मर्यादा ओलांडण्याचा देखील विचार करायला हवा.” असे अविनाश पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर अद्याप हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्याकडून मात्र काही प्रतिक्रिया आलेली नाही. दोन्ही गट आपलाच गट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असल्याचा दावा करत आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या