मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्याला मिळाला नवा जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

पुण्याला मिळाला नवा जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्ती झाल्यावर पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्यामुळे आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी राजेश देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

पुणे, 17 ऑगस्ट : पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्ती झाल्यावर पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्यामुळे आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी राजेश देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे.

नवलकिशोर राम यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या चांगल्या कामाची पावती देत त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार याची उत्सुकता होती. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या जागेवर अनुभवी अधिकाऱ्याला संधी दिली जाईल, असं बोललं जात होतं. त्यानुसारच राजेश देशमुख यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध, राजेश देशमुख यांचा परिचय :

राजेश देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यापासून देशमुख यांचा अजित पवार यांच्याशी संपर्क वाढला. आयएएस अधिकारी असलेले डॉ. राजेश देशमुख हे हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

राजेश देशमुख यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदापासून शासकीय सेवेला प्रारंभ केला होता. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देशमुख यांनी काम पाहिलं आहे. आयएसएस पदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची जबाबदारी मिळाली होती.

संपादन-अक्षय शितोळे

First published: