Home /News /pune /

Assam : अन्न-पाणी वेळेवर मिळेना, झोपायचेही हाल, अखेर आसाममध्ये अडकलेल्या 60 ते 70 विद्यार्थ्यांची सुटका

Assam : अन्न-पाणी वेळेवर मिळेना, झोपायचेही हाल, अखेर आसाममध्ये अडकलेल्या 60 ते 70 विद्यार्थ्यांची सुटका

भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरी मिळावी यासाठी मिलेट्री भरतीसाठी (Military Bharti) गेलेले महाराष्ट्रातील (Maharashtra) 60 ते 70 विद्यार्थी (students) हे आसाममध्ये (Assam) अडकले होते. या सर्व विद्यार्थ्यांची अखेर सुटका झाली आहे.

गुवाहाटी, 15 जानेवारी : सैन्यभरतीसाठी आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची अखेर सुटका झाली आहे. आसाम सरकारने अखेर विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सोडलं आहे. त्यानंतर आता सर्व विद्यार्थी न्यू हॉकलॉगच्या रेल्वे स्टेशनला दाखल झाले आहेत. तिथून विद्यार्थी गुवाहाटीला जातील. त्यानंतर रेल्वेने महाराष्ट्रात येतील. सर्व विद्यार्थी 19 जानेवारीला गुवाहाटी एक्सप्रेसने मुंबईत दाखल होतील, अशी माहिती राहुल वाळके या विद्यार्थ्याने 'न्यूज 18 लोकमत'ला दिलीय. विशेष म्हणजे 'न्यूज 18 लोकमत'च्या विनंतीवरुन आसामचे मराठी आयपीएस अधिकारी प्रतिक ठुबे यांनी या मुलांना सर्वोतपरी मदत केली. नेमकं प्रकरण काय? भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरी मिळावी यासाठी मिलेट्री भरतीसाठी (Military Bharti) गेलेले महाराष्ट्रातील (Maharashtra) 60 ते 70 विद्यार्थी (students) हे आसाममध्ये (Assam) अडकले होते. या सर्व विद्यार्थ्यांना आसाममध्ये क्वारंटाईन करण्यात आलं होतं. क्वारंटाईन कालावधी संपला नाही म्हणून काही मुलांना रुग्णालयातच ठेवण्यात आलं होतं. या मुलांच्या जेवणाची देखील सोय आसामच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नव्हती. विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरु होते. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारकडे साकडं घातलं होतं. आम्हाला आसाममधून तातडीने बाहेर काढा आणि आपल्या राज्यात घेऊन चला, अशी विनंती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारला केली होती. त्यांची हाक अखेर महाराष्ट्र सरकारने ऐकली आहे. (सैन्य भरतीसाठी गेलेले महाराष्ट्राचे 60 ते 70 विद्यार्थी आसाममध्ये अडकले) सुटका झाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया "आम्ही आसाम रायफल्सच्या सैन्य भरतीसाठी हॉकलॉग येथे आलो होतो. इथे आम्हाला काही कारणास्तव क्वारंटाईन करण्यात आलं होतं. इथे आमची खूप गैरसोय होत होती. आम्हाला पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नव्हतं. आमचे काही सहकारी जमिनीवर झोपले होते. त्यांना पांघरायला शाल देखील नव्हती. आम्ही महाराष्ट्र सरकारला सुखरुप घरी पाठविण्यासाठी विनंती केली. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी खूप प्रयत्न केले. अखेर ते प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. आम्ही महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानत आहोत", अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी सुटका झाल्यानंतर दिली. (तीन नोकऱ्या केल्यानंतर थकत होती महिला, प्रियकराला रोमान्ससाठी दिली सवत) दरम्यान, आसाममध्ये अडकलेल्या 60 ते 70 विद्यार्थ्यांनी मदतीसाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना कॉल केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला लवकरात लवकर मदत करावी अशी विनंती विद्यार्थ्यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर रुपाली पाटील यांनी आपण लगेच अजित पवार यांच्याशी संपर्क साधत माहिती दिल्याचं सांगितलं होतं. आसाममध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर राज्यात आणलं जाईल, असं आश्वासन रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिलं आहे. याशिवाय कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी देखील आसाममध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी व्यवस्था केल्याचं सांगितलं होतं.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या