तृतीयपंथी बाप्पाचरणी लीन.. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाअभिषेक

तृतीयपंथी बाप्पाचरणी लीन.. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाअभिषेक

पुण्यातील निर्भया (आनंदी जीवन) या संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही पुण्यातील समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि समाजाने नाकारलेल्या सर्व तृतीयपंथीयांच्या हस्ते श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिरात महाअभिषेक करण्यात आला.

  • Share this:

अद्वैत मेहता, (प्रतिनिधी)

पुणे, 5 सप्टेंबर: पुण्यातील निर्भया (आनंदी जीवन) या संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही पुण्यातील समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि समाजाने नाकारलेल्या सर्व तृतीयपंथीयांच्या हस्ते श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिरात महाअभिषेक करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील 370 कलम सरकारने नुकताच हटवला. ही बाब खरोखर गौरव करण्यासारखी आहे. आता सरकारने ट्रान्सजेंडर बिलावर योग्य तो निर्णय द्यावा. गणरायाला प्लास्टिकपासून दूर ठेऊन इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली आहे.

सूर्यमंदिराचा देखावा

दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ यंदा सूर्यमंदिराचा देखावा साकारला आहे. पुरीमधील कोणार्क मंदिरांसह 5 ठिकाणची मंदिरांची कलाकृती साकारण्यात आली आहे. या देखाव्याचे उद्घाटन 2 सप्टेंबरला नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. दिवसा सूर्याच्या प्रकाशात आणि रात्री विद्युत रोषणाईत हे मंदिर उजळून निघाले आहे.

गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट :'ऑस्ट्रेलियाचा राजा', कांगारुच्या देशात बाप्पांची धूम...

अक्षय कुडकेलवार, अ‍ॅडलेड, 28 ऑगस्ट : अठराव्या शतकात लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी तसेच भारतीय संस्कृतीचं जतन करण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली. बघता बघता या गणेशोत्सवाची व्याप्ती वाढत गेलीय. महाराष्ट्रात सुरुवात झालेला हा गणशोत्सव आता देशभरात साजरा केला जावू लागलाय. अलिकडच्या काही वर्षात तर हा उत्सव परदेशात सुद्धा अगदी थाटामाटात साजरा केला जातोय. परदेशात स्थायिक झालेले मराठी कुटुंब घरगुती गणशोत्सव साजरा करतातच मात्र सार्वजनिक गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचं प्रमाणही वाढलंय. परदेशात साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवामध्ये नावारुपास आलाय तो 'ऑस्ट्रेलियाचा राजा'. अर्थातच नावाप्रमाणे हा गणशोत्सव ऑस्ट्रेलियामध्ये असा साजरा केला जातो की लोक आपण ऑस्ट्रेलियात आहोत हे विसरूनच जातात.

आगमन गणेशाचं

2016 मध्ये साऊथ ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड मध्ये राहणाऱ्या काही भारतीय कुटुंबीयांनी एकत्र येवून 'युनायटेड इंडीयन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया' या संघटनेची स्थापना करुन 'ऑस्ट्रेलियाचा राजा' हा गणशोत्सव सुरु केला. हा गेणेशोत्सव इतका नावारुपास आला की गेल्या वर्षी पार पडलेल्या या दोन दिवसाच्या उत्सवात विविध भारतीय आणि विदेशी अशा दहा हजाराहून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली.

या उत्सवासाठी गणरायाची बारा फूट उंचीची मूर्ती ही खास लालबागहून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आली. तब्बल चाळीस दिवसांचा सागरी प्रवास करुन ही मूर्ती ज्यावेळी ऑस्ट्रेलियात पोहचली त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मूर्तीचे अॅडलेडच्या बंदरावर स्वागत केले होतं. या सोबतच चौदा फुटाचे मखर आणि ढोल लेझिम सुद्धा भारतातून पाठवण्यात आले होते.

कसे असतं' ऑस्ट्रेलियाच्या राजा'चे मॅनेजमेंट?

खासकरुन विदेशात कुठलेही उत्सवाचं आयोजन करायचं असल्यास नियमांचं अतिशय काटेकोर पद्धतीने पालन करावं लागतं. गणेशोत्सवाच्या नावाखाली जर महाराष्ट्रातील काही मंडळात चालतो तसा धुडघूस इथं घातला तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तुरुंगवास होवू शकतो. प्रदुषणाचे नियम तर अतिशय काटेकोर पाळावेच लागतात. चाळीस प्रकारच्या परवानग्या काढाव्या लागतात. सगळा खर्च आणि बॅंकेचे स्टेटमेंट पुरावे म्हणून द्यावे लागतात. उत्सवादरम्यान सहा फुटापेक्षा उंच शिडी वापरण्यापासून ते लहान मुलांना कसं हाताळावं या सर्व गोष्टींच्या परवानग्या घ्याव्या लागतात.

होळी दरम्यान या संपूर्ण उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली जाते. आठवड्यातील सुटीच्या दिवशी या मंडळाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडते. या बैठकीत उत्सवाचे स्वरुप आणि नियोजन ठरवले जाते. उत्सवादरम्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची जाबाबदारी निश्चित करण्यासाठी समित्यांची स्थापना करण्यात येते. आज घडीला पार पडणार्‍या या उत्सवासाठी विविध प्रकारच्या 19 समित्या आहेत. विविध परवानग्या पासून तर मंडपाच्या स्वच्छतेपर्यंतची जबाबदारी या समित्यांवर असते.

काटेकोर नियम

गणरायाच्या मिरवणूकीसाठी ज्या परिसरातून ही मिरवणूक जाणार आहे त्या परिसरातील सर्व घरी जावून ढोल-ताशांच्या वादनाची परवानगी घ्यावी लागते. एकूण घरांपैकी ९०टक्के घरांची परवानगी असेल तरच तुम्ही ढोल-ताशांचा गजर करु शकता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार सुदैवाने आजवर कधीही हे वादन अडचणीत आलेलं नाही. उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण सुद्धा मंडळाला ठेवावं लागतात. इतकच नाही तर तुमच्या उत्सव ठिकाणी पूर्ण वेळ आरोग्य सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन सुविधा उपलब्ध ठेवावी लागते, नसल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार हे नक्की.

एकाच धाग्यात बांधणारा बाप्पा

पुजेचं निर्माल्य आणि गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन हे सार्वजनिक तलावात करता येत नाही, किवा विसर्जण केलेल्या टब मधील पाणी सार्वजनिक तलावात सोडता येत नाही. या उत्सवादरम्यान ढोल-ताशा आणि लेझिमच्या सादरीकरणाची मेजवानी ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर बघायला मिळते. यासोबतच याठिकाणी भेट देणार्‍या जवळपास दहा हजार पाहुण्यांसाठी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात येते. पंडालच्या सजावटीपासून तर पंडालची स्वच्छता करण्यासाठी कुठलाही कामगार उपलब्ध नसतो. सगळा उत्सव हा स्वयंसेवक मिळूनच पार पाडतात. या गणेशोत्सवाने ऑस्ट्रेलियातल्या सर्व भारतीयांना एकत्र जोडलं आहे.

VIDEO: शिल्पा शेट्टीच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन, ढोल-ताशाच्या तालावर धरला ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या