मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

हाय प्रोफाइल महिलांसोबत सेक्सचं दाखवलं स्वप्न; पुण्यातील 76 वर्षीय व्यावसायिकाला 60 लाखांचा गंडा

हाय प्रोफाइल महिलांसोबत सेक्सचं दाखवलं स्वप्न; पुण्यातील 76 वर्षीय व्यावसायिकाला 60 लाखांचा गंडा

Crime in Pune: हाय प्रोफाइल महिलांसोबत शरीरसंबंध ठेवण्याचं स्वप्न दाखवत एका महिलेनं पुण्यातील एका व्यावसायिकाला तब्बल 60 लाखांचा गंडा घातला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 12 फेब्रुवारी: मागील काही काळापासून पुण्यासह महाराष्ट्रात सायबर गुन्ह्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. सायबर गुन्हेगार विविध प्रकारचं आमिष दाखवून सामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. त्यानंतर आरोपी त्यांची आर्थिक फसवणूक करत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune) एका किराणा व्यावसायिकासोबत घडला आहे. हाय प्रोफाइल महिलांसोबत शरीरसंबंध ठेवण्याचं स्वप्न दाखवत (lure of sex with high profile woman) एका महिलेनं त्यांना तब्बल 60 लाखांचा गंडा (60 Lakh fraud) घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित व्यावसायिकानं पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत वानवडी येथील एका महिलेसह तिच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 28 वर्षीय महिलेला वानवडी परिसरातून अटक (Accused woman arrested) केली आहे. तर तिच्या एका पुरुष साथीदाराचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-दिराने अमानुषतेची केली हद्द पार; वहिनीला दिला भयंकर मृत्यू, अखेर बिंग फुटलं नेमकं प्रकरण काय आहे? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 76 वर्षीय फिर्यादी व्यावसायिक पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी 'मिनाक्षी फ्रेन्डशीप क्लब'ची जाहिरात पाहिली होती. ही जाहिरात पाहून त्यांनी दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला आणि येथूनच हा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार सुरू झाला. हेही वाचा- जालना हादरलं! विष प्राशन करून एकमेकांना मारली मिठी, त्याच अवस्थेत दीर-भावजयीचा तडफडून मृत्यू वानवडी येथील रहिवासी असणाऱ्या महिलेनं फिर्यादी व्यावसायिकाला हाय प्रोफाइल महिलांसोबत शरीरसंबंध ठेवता येतील. तसेच यातून तुम्हाला पैसेही मिळतील असं आमिष दाखवलं होतं. फिर्यादी व्यावसायिक देखील आरोपी महिलेच्या बतावणीला बळी पडले. त्यानंतर आरोपी महिलेनं आपल्या एका पुरुष साथीदाराच्या मदतीने फिर्यादीकडून वेळोवेळी तब्बल 60 लाख 20 हजार रुपये उकळले आहेत. या प्रकरणी सायबर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिची कसून चौकशी केली जात आहे. तसेच तिने अशा पद्धतीने आणखी कोणाला फसवलं आहे का? याचा तपास केला जात आहे.
First published:

Tags: Crime news, Financial fraud, Pune

पुढील बातम्या