पुणे, 06 नोव्हेंबर: अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पुढील चोवीस तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून सुदैवाची बाब म्हणजे अरबी समुद्रात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्राला धोका नाही. पण आज आणि उद्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची (heavy rainfall) शक्यता आहे.
हवामान खात्याने आज पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पुण्यासह, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र येत्या २४ तासात अजून दाट होण्याची शक्यता,पण चांगली बाब, ते किनारपट्टी पासून दुर जात आहे.पण त्याचा प्रभाव पुढचे 2 दिवस कोकण किनारपट्टी आणी संलग्न भागावर असेल. आज मुंबई ठाणे...ढगाळ आकाश,☁ पावसाळी चिन्ह... मंद उन्हं⛅ असली की कसा उत्साह असतो..
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 6, 2021
पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लांबचा प्रवास टाळण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा-सावधान! माणसांपाठोपाठ आता पाळीव प्राण्यांमध्ये आढळला कोरोनाचा 'अल्फा' व्हेरिएंट
दुसरीकडे, आज मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून मागील चोवीस तासांत मुंबईत 10 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. उद्या राज्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनाच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारनंतर राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune rain, Weather forecast, महाराष्ट्र