Home /News /pune /

Love Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर

Love Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर

प्रेमविवाह (Love Marriage) केल्यानंतर वैचारिक मतभेद झाले. यानंतर दोन वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याने एकमेकांपासून घटस्फोट (Divorce) घेतला आहे. कौटुंबिक न्यायालयाने (Family Court) अवघ्या नऊ दिवसात घटस्फोट मंजूर केला आहे.

  पुणे, 18 मे : प्रेमविवाह (Love Marriage) केल्यानंतर वैचारिक मतभेद झाले. यानंतर दोन वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याने एकमेकांपासून घटस्फोट (Divorce) घेतला आहे. कौटुंबिक न्यायालयाने (Family Court) अवघ्या नऊ दिवसात घटस्फोट मंजूर केला आहे. पुणे (Pune) येथे ही घटना घडली. दोन्हीही शिक्षित तरी... दोन्ही पती पत्नीने अॅड. आकाश सुधीर चव्हाण आणि अॅड. खय्युम नय्युम सय्यद यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने अर्ज दाखल केला होता. विकास आणि सीमा अशी या दोघांची नावे आहेत. दोन्हीही शिक्षित आहेत. त्यांना मूळबाळ नाही. मे 2019 मध्ये त्याचा प्रेमविवाह झाला होता. यानंतर जानेवारी 2020 पासून ते वेगळे राहत होते. ते वेगळे राहत असल्यामुळे एकत्र येण्याची शक्यता नव्हती. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्यानुसार, सहा महिन्याचा कालवधी वगळण्याची मागणी अर्जदाराच्या वकिलांनी केली होती. त्यामुळे अवघ्या 9 दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. हेही वाचा - लग्नात आलेलं Gift उघडताच Blast, नवविवाहित तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार
  अर्जदाराचे वकील काय म्हणाले -
  काही जणांचे स्वभावच असे असतात की जुळवून घेता येत नाही. यामुळे प्रेम विवाह बरोबर आहे किंवा नाही, हे सांगणे कठीण आहे. म्हणून नात्यात समजूतदारपणा असणे आवश्यक आहे. या प्रकरणात परिस्थिती पाहिली तर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने वेळ, पैशाची बचत आणि मानसिक त्रासातून सुटका झाली आहे. अॅड. आकाश सुधीर चव्हाण आणि अॅड. खय्युम नय्युम सय्यद या अर्जदारांच्या वकिलांनी ही प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारे प्रेमविवाह केलेल्या या दाम्पत्याचा अवघ्या नऊ दिवसात घटस्फोट मंजूऱ झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Divorce, Love, Marriage, Pune

  पुढील बातम्या