पुणे, 6 मे : पुण्यात Lockdown3 मध्ये निर्बंध शिथिल करण्याची चर्चा गेले 2 दिवस सुरू आहे. अखेर पुण्याच्या आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळात अत्यावश्यक गोष्टींची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय इतर दुकानांनाही ठरलेल्या दिवशी उघडायला परवानगी मिळाली आहे.
आयुक्त शेखर गायकवाड यांनी कुठल्या प्रकारची दुकानं कुठल्या दिवशी सुरू राहणार याची यादीच जाहीर केली आहे. त्या त्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच दुकानं उघडण्यास दुकानदारांना परवानगी देण्यात आली आहे.
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार 1 किमी परिक्षेत्रात एका प्रकारचं एकच दुकान सुरू ठेवता येईल. पुण्यात प्रशासनाने 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केली आहेत.तिथे मात्र फक्त 10 ते 2 या वेळात दूध, किराणा वगैरे आवश्यक सेवांची दुकानंच उघडी राहतील. बाकी परिसर बंद राहील.इतर सर्व भागातली दुकाने 12 तास खुली राहणार आहे. सरकारने या आधीच सर्व दुकानांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
मध्यवर्ती पुण्यातल्या लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड तसंच कोंढव्यातला एनआयबीएम रोड यावरची कुठलीही दुकानं उघडायला मनाई आहे. छोट्या गल्ली आणि रस्त्यांवरची दुकानं एका किलोमीटरच्या परिसरात एका प्रकारचं एकच दुकान या नियमानं उघडायला परवानगी देण्यात आली आहे.
संबंधित - पुण्यासाठी पालिकेने घेतला मोठा निर्णय, उद्यापासून असे होणार बदल
व्यापारी संकुल, मॉल बंदच राहतील. पण कंनेन्मेंट झोन नसेल तर सोसायट्यांमधली छोटी दुकानं उघडायला परवानगी दिली आहे.
कुठल्या वारी कुठली दुकानं उघडणार याची यादी
17 मे रोजी लॉकडाऊन संपणार आहे. मात्र त्या आधीच हळूहळू काही ढिल देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारलाही एक अंदाज येणार असून 17 मे नंतर काय निर्णय घ्यायचे याचाही अंदाज येणार आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज त्यात भर पडत आहे. मात्र असं असतानाही महापालिकेने नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकाने खुली करण्याचा निर्णय पालिकेने जाहीर केलाय. प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने खुली राहणार आहेत. तर इतर भागात सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या काळात सर्व दुकाने सुरू राहणार असल्याचं महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं.
अन्य बातम्याकोरोना’विरूद्धची सगळ्यात मोठी बातमी, ‘लस’शोधल्याचा इटलीचा दावा30 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकार मोठी मदत करण्याची शक्यता,मोठा दिलासा! 2 दिवसात राज्यात 700 कोरोनारुग्ण झाले बरेकोरोनाबाबत मोठा खुलासा करणार होता चीनचा संशोधक; गोळी मारुन केली हत्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.