मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

ऑनलाइन ऑर्डर केल 37 हजारांचा लॅपटॉप, मिळाला फरशीचा तुकडा

ऑनलाइन ऑर्डर केल 37 हजारांचा लॅपटॉप, मिळाला फरशीचा तुकडा

लॉकडाऊनमध्ये आपण घरबसल्या अनेक गोष्टींची खरेदी ऑनलाइन बिनधास्तपणे करत असतो पण सावधान!

लॉकडाऊनमध्ये आपण घरबसल्या अनेक गोष्टींची खरेदी ऑनलाइन बिनधास्तपणे करत असतो पण सावधान!

लॉकडाऊनमध्ये आपण घरबसल्या अनेक गोष्टींची खरेदी ऑनलाइन बिनधास्तपणे करत असतो पण सावधान!

  • Published by:  Kranti Kanetkar
पिंपरी-चिंचवड, 06 जून : लॉकडाऊन आणि कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होम अनेक कंपन्यांनी सुरू केलं आहे. यासाठी अमेझॉनवरून एका ग्राहकानं 37 हजार 990 रुपयांचा लॅपटॉप मागवला. पण लॅपटॉप ऐवजी फरशीचा तुकडा पार्सलमध्ये आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पिंपरीमधील तळवडे इथे ही घटना समोर आली आहे. चिन्मय मधोळकर नावाच्या 36 वर्षाय तरुणानं अमेझॉनवरून वर्क फ्रॉम होम करण्यासाठी ऑनलाइन लॅपटॉपची ऑर्डर दिली. ऑनलाइन पेमेंट पद्धत वापरून क्रेडिट कार्डवरून चिन्मय यांनी पैसेही भरले. त्यानंतर 29 मे रोजी त्यांना एका डिलिव्हरी बॉयनं पार्सल आणून दिलं. पार्सल उघडून पाहिल्यावर चिन्मय यांना मोठा धक्काच बसला. कारण लॅपटॉपऐवजी त्यामध्ये फरशीचा तुकडा होता. हे वाचा-क्या बात है! भारतात सुरू झालं कोरोना लसीचं उत्पादन, 'या' कंपनीशी झाला करार त्यांनी याबाबत अमेझॉनशी संपर्क साधला. मात्र अमेझॉनकडून आम्ही तुम्हाला लॅपटॉपच पार्सल पाठवल्याचं सांगितलं. कंपनीनं लॅपटॉप पाठवला बाकी काही माहीत नाही असं उत्तर मिळालं. त्यानंतर चिन्मय यांनी पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली आहे. देहूरो पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच ऑनलाइन खरेदी करताना सावधान राहण्याचं आवाहनही पोलिसांनी ग्राहकांना केलं आहे. हे वाचा-ना साडी ना श्रृंगार, कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलीस अधिकाऱ्यांची वटपौर्णिमा संपादन- क्रांती कानेटकर
First published:

Tags: Coronavirus, Pune news, Pune police

पुढील बातम्या