Home /News /pune /

मोठी बातमी, पुण्यात 15 तारखेपासून लागणार लॉकडाउन? पण प्रशासनाने केला खुलासा

मोठी बातमी, पुण्यात 15 तारखेपासून लागणार लॉकडाउन? पण प्रशासनाने केला खुलासा

ज्या ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येईल, त्या भागाची परिस्थिती लक्षात घेऊन नव्याने कंटेन्मेंट झोनची रचना करण्यात येणार आहे.

    पुणे, 14 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. अनलॉक 1 सुरू झाल्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा लॉकडाउन लागू होणार का? अशी चर्चा रंगली होती. पण, पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावर स्पष्ट खुलासा केला आहे. पुणे शहर आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. परंतु, दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे शहरात 15 जूनपासून पुन्हा कडक लॉकडाउन लागू होणार अशी चर्चा रंगली होती. पण, असे असले तरी शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्याची शक्यता कमीच आहे. शहरात येत्या सोमवारपासून पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा आमचा कोणताही निर्णय झाला नाही, असं महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. हेही वाचा -गाढ झोपेत होतं गाव, रात्रीच्या अंधारात कुऱ्हाडी-कोयते घेऊन घुसले दरोडेखोर आणि... लॉकडाउनच्या काळात ज्या भागात जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तो परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता. आता पुण्यात जो भाग आधी ग्रीन झोनमध्ये होता तिथेही रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे ज्या ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येईल, त्या भागाची परिस्थिती लक्षात घेऊन कंटेन्मेंट आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून नव्याने त्या परिसराची रचना करण्यात येईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.  या बाबतचा आदेश हा सोमवारी दिनांक 15 जून रोजी काढण्यात येणार आहे, असंही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 14650 वर दरम्यान,  आज राज्यात 3427 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 568वर गेली आहे.  तर गेल्या दिवसभरात  113 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या मृतांची संख्या  3830 वर गेली आहे. मुंबईत सर्वाधिक 69 मृत्यू मुंबईत झालेत  तर पुण्यात 10 मृत्यू झाले.  आज 1550 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत 49 हजार 346 जणांना घरी सोडण्यात आले आहे. हेही वाचा -शरीराच्या 'या' भागांना वारंवार स्पर्श करणं पडेल महागात; बळावतील अनेक आजार पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोनाबाधित रुग्णं बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 04 हजार 887 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 658 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. संपादन- सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या