पुणे, 11 मे : पुणे जिल्हा पर्यटनाच्या (pune district tourism) बाबतीत महाराष्ट्रात अग्रेसर आहे. गडकिल्ले राज्यात सर्वात याच जिल्ह्यात येतात यामुळे या जिल्ह्याला नैसर्गिक संवर्धन मोठ्या प्रमाणात मिळाले आहे. जंगली भाग जास्त असल्याने या जिल्ह्यात वन्यप्राण्याचा वावरही मोठा आहे. यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने एक पाऊल उचलले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी वन्यजीव सफारी प्रकल्प राबवण्याचं काम हाती घेतलं आहे. (Wildlife Safari Project)
पुणे जिल्हा आता बिबट्यांसह वाघ-सिंहांच्या गर्जनेने दणाणण्यासाठी अजित पवार यांनी सूचना केल्या आहेत. बारामती तालुक्यातील गाडीखेल येथे वाघ, सिंह; तर जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प करण्याचे आता निश्चित झाले करण्यात आले आहे. यासाठी प्राथमिक कामांनी वेग घेतला आहे. (Wildlife Safari Project)
या दोन्ही प्रकल्पांची जागानिश्चिती झाली आहे. आता मोजणी, प्रकल्प अहवाल, प्रकल्प सल्लागार नियुक्ती, अशी कामे सुरू झाली असून, येत्या एक-दोन वर्षांत दोन्ही प्रकल्प आकाराला येतील, अशी शक्यता आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.
जुन्नर तालुका (junnar tehsil) यापूर्वीच पर्यटन तालुका म्हणून जाहीर झालेला आहे, तर बारामती तालुक्यात या प्रकल्पाबरोबरच शिवसृष्टीचा प्रकल्प आकाराला येत असल्याने बारामती (baramati) आणि परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामतीत मयूरेश्वर अभयारण्य आहे तसेच लगतच्या इंदापूर तालुक्यात निसर्गरम्य उजनी उजनी बॅक वॉटर परिसर असल्याने या भागातील पर्यटन विकासाला बहर येणार आहे.
जुन्नरचा बिबट सफारी प्रकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला नेला, असा आरोप करीत मध्यंतरी राजकारणही फार झाले. जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी तर उपोषणही केले. परंतु, आता वाघ-सिंह प्रकल्प बारामतीला आणि बिबट सफारी प्रकल्प जुन्नरला नक्की झाल्याने राजकीय वाद निवळून प्रकल्प मार्गी लागले.
दाजीपूरमध्ये ही होते जंगल सफारी
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेच्या दक्षिण टोकाला असलेले महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे. प्रामुख्याने ते रानगवा यासाठी प्रसिद्ध आहे. १९५८ साली स्थापन करण्यात आलेल्या या अभयारण्यात ३५ प्रकारच्या वन्य प्राण्यांची व २३५ पक्षी प्रजातींची नोंद आहे. १८०० प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या तर ३०० औषधी वनस्पती आहेत. सन २०१२ मध्ये युनेस्कोने राधानगरी अभयारण्याचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Pune (City/Town/Village), Wild animal, Wild life