Home /News /pune /

Weather Forecast: राज्यात पुन्हा गारपिटीचं सावट; विकेंडला पुण्यासह या जिल्ह्यात कोसळणार सरी

Weather Forecast: राज्यात पुन्हा गारपिटीचं सावट; विकेंडला पुण्यासह या जिल्ह्यात कोसळणार सरी

Weather Forecast in Maharashtra: आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी (rainfall) पोषक हवामानाची नोंद झाली आहे. येत्या विकेंडला राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    मुंबई, 18 जानेवारी: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची (Dry weather) नोंद करण्यात आली आहे. दरम्यान खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका (Cold wave) जाणवला. पण त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी (rainfall) पोषक हवामानाची नोंद झाली आहे. येत्या विकेंडला राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तुरळक ठिकाणी गारपीट (Hailstorm) होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्या योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर 21 आणि 22 जानेवारी रोजी संबंधित विभागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर येत्या काही दिवसांत कोकणासहित दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये थंडी कमी जाणवणार आहे. त्यानंतर मात्र संबंधित परिसरात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-भारतात कधी शिगेला पोहोचणार कोरोनाची तिसरी लाट? रोज येणार 7 लाखहून अधिक नवे रुग्ण हवामान खात्याने शनिवारी (22 जानेवारी) पुण्यासह मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, अहमदनगर, रत्नागिरी आणि रायगड या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी हवामान खात्याने कोणताही इशारा जारी केला नाही. परंतु विकेंडला येथे ढगाळ हवामान राहणार आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकेंडला कोकणात फिरायला जाणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. हेही वाचा-Covid Symptoms: तज्ज्ञ सांगतात, Long Covid रुग्णांमधली ही लक्षणं चिंताजनक दुसरीकडे, 21 ते 23 जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालय परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. तर 22 जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशात पावसासह बर्फवृष्टी होणार आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढील तीन दिवस दाट धुके पडणार आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Mumbai, Pune, Weather forecast

    पुढील बातम्या