Home /News /pune /

Weather Alert! राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे; पुण्यासह या जिल्ह्यात बरसणार सरी

Weather Alert! राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे; पुण्यासह या जिल्ह्यात बरसणार सरी

Weather Forecast Today: ऐन हिवाळ्यात गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी (Non seasonal rainfall) लावली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत.

    पुणे, 21 जानेवारी: ऐन हिवाळ्यात गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी (Non seasonal rainfall) लावली आहे. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. असं असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. आज पासून पुढील तीन दिवस मुंबई पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. हवामान खात्याने आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात ढगाळ हवामानाची (Cloudy weather) नोंद केली आहे. आज सकाळापासूनच याठिकाणी ढगाळ हवामान आहे. पुढील दोन तीन तासात या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उद्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आधीच पावसाळ्यात अतिवृष्टीने येथील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. अशात पुन्हा एकदा येथे अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. हेही वाचा-15 वर्षांखालील मुलांना Covid लस देणार? केंद्रानं दिलं उत्तर उद्या मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. परवा (रविवारी) राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून यादिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतच पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, 23 जानेवारी नंतर राज्यात पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा (Cold wave in maharashtra) वाढण्याची शक्यता आहे. हा थंडीचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर राज्यातील हवामान सामान्य होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात आज पाषाण याठिकाणी सर्वात कमी 10.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ हवेली येथे 10.3, शिवाजीनगर 11, शिरूर 11.1, एनडीए 11.1, तळेगाव 11.3, माळीण 11.4, राजगुरूनगर 11.4 आणि इंदापूर याठिकाणी 11.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Todays weather, Weather forecast

    पुढील बातम्या