...आणि दिवाळीनंतर पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळणार

...आणि दिवाळीनंतर पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळणार

पाण्यासंबंधी पुणेकरांसाठी एक वाईट बातमी आहे. पुण्यात दिवाळीनंतर पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे 23 ऑक्टोबर : पाण्यासंबंधी पुणेकरांसाठी एक वाईट बातमी आहे. पुण्यात दिवाळीनंतर पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार आहे. दिवाळीनंतर शहरात एक वेळच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळी जरी आनंदात गेली तरी दिवाळीनंतर पाणी संकट ओढावणार इतकं नक्की.

यासंबंधी आज महापौरांनी पाण्याच्या पुरवठ्याच्या नियोजनासाठी महत्वपूर्ण बैठक बोलवली आहे. दरम्यान, शहराला पाणी पुरवठा कराणाऱ्या खडकवासला आणि पानशेत, वरसगाव आणि चेमघर धरणात गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने पुण्याला यंदा पाणीकपातीला सामोरं जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दिवाळीनंतर पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार असून शहरात एकच वेळ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

पाणी पुरवठा कसा करायचा याचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून आज पक्षनेते आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या बैठकीत सहमती झाली तर ते हे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. मात्र त्याची त्याची अंमलबजावणी दिवाळी झाल्यानंतर करण्यात येईल.

दरम्यान, काहीही झालं तरी दिवाळीत पाणी कपात होऊ देणार नाही अशी घोषणा राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली होती. त्यामुळे पाणीकपातीच्या मुद्द्यावर सरकार कोडींत सापडलं होतं. पण दिवाळीत पाणी कपात करून नागरिकांचा रोष पत्करण्यापेक्षा सरकारने दिवाळीनंतर पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर ऑक्टोबर महिन्यातील पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहे. राज्यातील टँकरच्या संख्येने आता ४०० चा टप्पा ओलांडला असून आता पर्यत तब्बल ४२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर राज्यातील पाणीसाठय़ाचे प्रमाण ६१.९६ टक्क्यांपर्यंत खाली आले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के हा पाणीसाठा कमी आहे.

तुम्ही मृत्यू जवळून पाहिलात का? नसेल तर हा VIDEO नक्की पाहा

First published: October 23, 2018, 8:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading