मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

VIDEO: जुन्नरमध्ये बिबट्या थरार; अचानक बिबट्या कार समोर आला आणि मग...

VIDEO: जुन्नरमध्ये बिबट्या थरार; अचानक बिबट्या कार समोर आला आणि मग...

Leopard video goes viral: जुन्नरमध्ये अचानक कारसमोर बिबट्या आला. रात्रीच्या सुमारासची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Leopard video goes viral: जुन्नरमध्ये अचानक कारसमोर बिबट्या आला. रात्रीच्या सुमारासची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Leopard video goes viral: जुन्नरमध्ये अचानक कारसमोर बिबट्या आला. रात्रीच्या सुमारासची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जुन्नर, 13 मे: जुन्नरमध्ये बिबट्याची (Leopard in Junnar) दहशत काही नवीन नाहीये. कधी माणसांवर हल्ला तर कधी पाळीव प्राण्यावर हल्ला होण्याच्या घटना नेहमी चर्चेत असतात. अशातच एक मुक्त बिबट्याचा व्हिडीओ (Leopard video) समोर आला आणि अनेकांच्या अंगावर या व्हिडीओने थरकाप उडवला आहे. कारमधून प्रवास करत असताना मुक्त बिबट्याच दर्शन झालं तर हा अनुभव अंगावर शहारा आणणारा असतो. असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे ओतूर परिसरातून.

जुन्रर तालुक्यातील ओतूर येथील कपर्दिकेश्‍वर मंदिराजवळ मांडवी नदी पूलाजवळच्या कठड्याजवळ अचानक एक पिळदार शरिरयष्टी असलेला बिबट्या घरी कार समोर आला. मुक्त बिबट्याचा हा व्हिडीओ ओतूर परिसरातून समोर आला आहे. घरी जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कार समोर हा बिबट्या आला आणि सैरभैर झाला.

या बिबट्याच्या चपळाईची ही दृश्य या कार मधील एका व्यक्तीने आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. बुधवारी रात्री 9 च्या दरम्यान ही घटना घडली असून सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्याने या बिबट्याची दहशत मात्र या परिसरात पसरली आहे.

PHOTOS : पुण्याच्या तरुणाने रचला इतिहास, Everest वरच्या जगातील दहाव्या उंच 'माऊंट अन्नपूर्णा - 1' शिखरावर यशस्वी चढाई

मागील काही दिवसात ऊस तोडणी सुरू असताना अनेकदा उसाच्या फडातुन डरकाळी फोडणारे बिबट किंवा त्यांचे बछडे पाहण्याची संधी सहजरित्या या परिसरात उपलब्ध होते. कधी मोटारसायकलवरून जाणाऱ्या प्रवाशांवर हल्ला करणाऱ्या घटनाहीं घडतात. मात्र अचानक समोर एखादा मुक्त बिबट आला तर त्याची चपळाई, त्याची चतुराई आणि त्याच्या डरकाळ्या तुमच्या डोळ्यांना भेदरवून टाकतील. शिवाय मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्याचंही तुम्ही विसराल. मात्र काही जण मात्र ही दृष्य टिपतात आणि हा थरार अनेकांपर्यत पोहचवतात.

First published:

Tags: Leopard, Pune