पुण्यात झालेला असा हल्ला तुम्ही कधी पहिला नसेल! अंधारात 'तो' आला अन् त्यानं....पाहा VIDEO

पुण्यात झालेला असा हल्ला तुम्ही कधी पहिला नसेल! अंधारात 'तो' आला अन् त्यानं....पाहा VIDEO

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  • Share this:

पुणे, 20 सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. बिबटे कुत्र्यांना आपले भक्ष्य बनवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. बिबट्यानं एका क्षणात कुत्र्याचा फडशा पाडला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे बिबट्यानं महिनाभरात एकाच मालकाची तीन कुत्र्यांचा फडशा पाडला आहे.

हेही वाचा...काय सांगता? इथे हत्तीला द्यावा लागतो टॅक्स...नेमका काय आहे प्रकार पाहा VIDEO

शिंगवे परिसरात राहणारे काळुराम सहादू लोखंडे यांचा कुत्रा बिबट्याने ठार केल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना रविवारी (20 सप्टेंबर ) मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास घडली आहे. काळुराम लोखंडे यांचे हे एका महिन्यात तिसऱ्या कुत्र्याला बिबट्यानं ठार मारलं आहे.

वळती ते शिंगवे रस्त्यावर काळुराम सहादू लोखंडे हे शेतकरी राहतात. सभोवताली ऊसाचे क्षेत्र अधिक आहे. त्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यांनी घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. रविवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास शेजारच्या ऊसाच्या शेतातून बिबट्या आला. त्याने मोठ्या कुत्र्याला जमिनीवर सहज लोळवले व उचलून नेलं.

काळजाच्या तुकड्याचा वाचवण्यासाठी चित्त्यासोबत भिडली आई...

दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माणूस असो की प्राणी जात आई आपल्या पिल्लावर आलेलं संकट थोपवून किंवा परवून लावण्यासाठी आपल्या जीवाचं रान करते. अगदी शिकारीसाठी आलेला एखादा प्राणी-पक्षी असो किंवा आपल्या पिल्लावर आलेलं नैसर्गिक संकट असो आई आपल्या काळजाच्या तुकड्याला आपल्या जीवापेक्षा जास्त जपते त्याची काळजी घेते आणि माया करते.

सोशल मीडियावर असाच एक शिकारीचा थरारक VIDEO व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिराफाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी आलेल्या चित्त्याला मादा जिराफ पळवून लावते. आपल्या पिल्लावर शिकारीचं संकट येऊ देत नाही. त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून ती चित्त्याशी पंगा घेते आणि आपल्या मुलाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ IFS सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 12.2 हजार लोकांनी पाहिला आहे. 187 लोकांनी रिट्वीट केला आहे. या आधी काही दिवसांपूर्वी रानडुकराच्या पिल्लाची शिकार होताना मादा डुक्कर या पिल्लाला वाघ्याच्या जबड्यातून पिल्लाची सुटका करण्यासाठी धडपडत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता जिराफाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 20, 2020, 5:22 PM IST

ताज्या बातम्या