Home /News /pune /

Leopard attack in Pune: पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत, एकाच दिवशी चार ठिकाणी चौघांवर हल्ला

Leopard attack in Pune: पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत, एकाच दिवशी चार ठिकाणी चौघांवर हल्ला

Pune News: वाढत्या उन्हात जंगलातील प्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येत असल्याचं पहायला मिळत आहे.

जुन्नर, 11 मे : वाढता उन्हाळा आणि अन्न पाण्याच्या शोधात असलेले बिबट मानवी वस्तीकडे येऊ लागल्याने मानवी वस्ती शिरकाव आणि हल्ले वाढले असल्याचं दिसत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात (Pune district) काल एकाच दिवशी 4 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्यात 2 महिला आणि 2 पुरुष जखमी झाले (4 people injured in leopard attack) आहेत. खेड तालुक्यातील रेटवडी येथे दोन ठिकाणी 2 महिला जखमी झाल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे या ठिकाणी 1 युवक आणि जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव या ठिकाणी एका युवक यांच्यावर हे हल्ले झाले आहेत. बिबट्याच्या या हल्ल्यात सर्वजण जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्याने वन्यप्राणी भक्षाच्या व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येत असल्याने हल्ले वाढले आहेत. पहिली घटना खेड तालुक्यातील रेटवडी येथील महिलांच्या डोक्यात, तोंडावर बिबट्याने पंजा मारला आणि चावा घेतल्याने दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. अरुणा संजय भालेकर, रिजवना अब्दुल पठाण ह्या गंभीर जखमी महिलांची नावे आहेत. त्यांच्यावर खोलवर जखमा होऊन रक्तस्राव झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वाचा : बॉयफ्रेंडच्या भावाला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडचा खटाटोप, पिंपरीत तोतया महिला पोलिसाला अटक ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण दुसरी घटना जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगावच्या भोरमळ्यात सुदर्शन शिंदे रात्री आपल्या शेतातून काम उरकून मोटारसायकलवरुन घरी परतत होते. खोड्द नारायणगाव रोडवर भोरमळा येथे 2 बिबट्यांनी त्याचा जोरजोरात पाठलाग करुन त्याच्यावर हल्ला केला असता सुदर्शन मोटार सायकलसह रस्त्यावर कोसळला. गाडी पडल्याच्या आवाजाने आणि आरडाओरडा केल्याने बिबटे पळून गेले. शिंदे परिवाराने लागलीच त्याला डॉक्टरकडे नेत उपचार चालू केले. वाचा : मधुमेह आजाराला कंटाळून एकाने घेतला गळफास, पुण्यातील धक्कदायक घटना तिसरी घटना आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील डोंगरमळ्यात बाजरी पिकाला पाणी देणाऱ्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये ओंकार दिलीप टेमगिरे (वय 17) हा तरुण जखमी झाला आहे. मंचर ते बेल्हे रस्त्यावर थोरांदळे गावाच्या अलीकडे डोंगरमळा आहे. येथील तरुण ओंकार दिलीप टेमगिरे हा बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाजरी पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. त्यावेळी बारे सुरू करण्यासाठी तो वाकला असता बाजरी पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याने ओंकार टेमगिरे घाबरला. त्याने आरडाओरडा केला. त्यावेळी शेजारी असलेले योगेश पोपट टेमगिरे तेथे धावत आले. तोपर्यंत बिबट्याने तेथून उसाच्या शेतात धूम ठोकली होती. आरडाओरडा केल्याने ओंकारचा जीव वाचला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Leopard, Pune

पुढील बातम्या