स्त्रीरोगतज्ज्ञ लीलाताई गोखलेंनी केलं वयाचं शतक पूर्ण

पुण्यातील जुन्या काळातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. लीलाताई गोखले यांनी नुकतंच वयाचं शतक पूर्ण केलं. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना होणारा त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बीचा उपयोग कसा होतो हे त्यांचं संशोधन आजही दुर्लक्षित राहिलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 18, 2017 02:32 PM IST

स्त्रीरोगतज्ज्ञ लीलाताई गोखलेंनी केलं वयाचं शतक पूर्ण

अद्वैत मेहता, पुणे, 18 नोव्हेंबर : पुण्यातील जुन्या काळातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. लीलाताई गोखले यांनी नुकतंच वयाचं शतक पूर्ण केलं. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना होणारा त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बीचा उपयोग कसा होतो हे त्यांचं संशोधन आजही दुर्लक्षित राहिलंय. स्त्रियांच्या शारीरिक ,मानसिक,सामाजिक स्वास्थ्याबद्दल त्यांना आस आहे. आजही त्या अत्यंत सकारात्मक आयुष्य जगत आहेत.

'बरं झालं माझे गुडघे निकामी झाले पण माझा मेंदू निकामी झाला नाही,' असं मिश्किलपणे म्हणणाऱ्या लीलाताई आजही खळखळून हसतात आणि आपण मिळवलेलं ज्ञान वाटत सुटतात. वाचन,लिखाण,विणकाम, क्रोशे असं काय काय करत त्या समृद्ध जीवन जगतात.

स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेलं संशोधन मोलाचं पण दुर्लक्षित राहिलं. lancet सारख्या मेडिकल जर्नलमध्ये ते यावं यासाठी मोठा संघर्ष त्यांनी केला. व्हिटॅमिन  बीचा उपयोग मासिक पाळी काळात स्त्रियांना होणारा त्रास कमी करायला मदत करतो हे सांगणारा तो लेख होता. आजकाल मुलगा हवा म्हणून भ्रूणहत्या होतात याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संस्कृत, मराठी ,इंग्लिश कविता ,सुभाषिते मुखोद्गत ,जबर पाठांतर याचा प्रत्यय त्यांच्याशी बोलताना येतो.अनुभवाचे बोल आणि  माझी गोष्ट या 2 पुस्तकातून त्यांनी आपलं अनुभवाचं संचित सर्वांसाठी खुलं केलंय.News 18 लोकमत तर्फे त्यांना सलाम आणि शुभेच्छा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2017 02:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...