Home /News /pune /

पुण्यात तापमानाचा पारा घसरला; वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रात पडणार हाडं गोठावणारी थंडी

पुण्यात तापमानाचा पारा घसरला; वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रात पडणार हाडं गोठावणारी थंडी

Weather Update in Maharashtra: महाराष्ट्रात हळुहळू थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुण्यातील शिरूर येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

    पुणे, 08 डिसेंबर: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure area) गेली काही दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पाऊस कोसळला (heavy rainfall in maharashtra) आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात (bay of bengal) निर्माण झालेल्या 'जवाद' चक्रीवादळाचा (Cyclone Jawad) भारताच्या पूर्व किनारपट्टी चांगलाच फटका बसला आहे. पण गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात पाऊस पूर्णपणे थांबला आहे. पण नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सरल्यानंतर देखील राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पण आता हळुहळू थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद (temperature in maharashtra) झाली आहे. याठिकाणी आज 13.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या आठवड्यात महाराष्ट्रासह राज्यात आणखी गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हेही वाचा-आता सुईविना कोरोनाची लस ! नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबरनंतर उत्तरेकडील थंडगार वारे महाराष्ट्राच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी अति उच्च दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे. या एकंदरीत परिणाम म्हणून डिसेंबरचा शेवटचा आठवडा महाराष्ट्रासाठी हाडं गोठावणारा ठरणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. आज सकाळी पुण्यातील शिरुर याठिकाणी सर्वात कमी 13.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच हवेली (13.4), पाषाण (13.7) एनडीए (13.9), शिवाजीनगर (14.3), माळीण (14.4) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातील अन्य ठिकाणी 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान तपामान आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather update

    पुढील बातम्या