Home /News /pune /

उत्तर भारत गारठला, तापमानाचा पारा 8 अंशावर, कशी असेल महाराष्ट्रातील स्थिती?

उत्तर भारत गारठला, तापमानाचा पारा 8 अंशावर, कशी असेल महाराष्ट्रातील स्थिती?

Latest Weather Update: उत्तर भारतात मात्र किमान तापमानात विक्रमी नोंद झाली आहे. गुरुवारी दिल्लीतील लोधी रोड परिसरात विक्रमी 8.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

    पुणे, 10 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात (Weather in india) झपाट्याने बदल जाणवत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रासह दक्षिण-पूर्व भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी (heavy rainfall) लावली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. रब्बी हंगामातील अनेक पिकांवर किड पडल्याने संपूर्ण पीक वाया गेलं आहे. असं असताना अद्याप राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पण उत्तर भारतात मात्र किमान तापमानात विक्रमी नोंद झाली आहे. गुरुवारी दिल्लीतील लोधी रोड परिसरात विक्रमी 8.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद (Minimum temperature in india) झाली आहे. यावर्षीचं सर्वात कमी तापमान म्हणून याची नोंद करण्यात आली आहे. खरंतर सध्या हिमालयातून दक्षिण दिशेनं येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात हुडहुडी वाढली आहे. हेही वाचा-Omicron चा धोका असतानाच नाशकात कोरोनाचा उद्रेक, 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण पुढील काही दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी उत्तर भारतातील किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवणार आहे. डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा महाराष्ट्रासाठी देखील हाडं गोठावणारा ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हेही वाचा-मोठा दिलासा; पुण्यातील पहिला ओमायक्रॉन बाधित रुग्ण कोरोनामुक्त आज दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी झाली आहे. पण याठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. पुढील पाचही दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. विकेंडनंतर सोमवार आणि मंगळवारी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुण्यात पुढील पाच दिवस कोरडं हवामान राहणार आहे. पुण्यातील हवेली येथे सर्वात कमी 14.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्यात अन्य ठिकाणी 15 ते 18 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India, Weather update

    पुढील बातम्या