Home /News /pune /

Weather Update: राज्यात कडाक्याची थंडी; जळगावात तापमान 7 अंशावर, पुण्यातही घसरला पारा

Weather Update: राज्यात कडाक्याची थंडी; जळगावात तापमान 7 अंशावर, पुण्यातही घसरला पारा

Latest Weather Forecast in Maharashtra: येत्या काही दिवसांत उत्तर भारतात किमान तापमानाचा काही अंशी घसरण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

    पुणे, 01 फेब्रुवारी: फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर देशात उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते. पण यावर्षीय फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान (Temperature in India) सरासरी तापमानापेक्षा कमीच राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी एक महिनाभर राज्यात थंडी (Cold wave) कायम राहण्याची शक्यता आहे. अशात मागील काही दिवसांपासून राज्यात धुक्यासह थंडीचा कडाका वाढतच चालला आहे. येत्या काही दिवसांत उत्तर भारतात किमान तापमानाचा काही अंशी घसरण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आज सकाळी जळगावात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी तापमानाचा पारा 7.5 अंशावर पोहोचला होता. हेही वाचा-Coronavirus: कधी होणार कोरोनाचा The End...भारतातील मोठ्या वैज्ञानिकांनी दिलं उतर यासोबतच राज्यात बहुतांशी जिल्ह्याचं तापमान 2 ते 3 अंशानी घटलं आहे. आज नाशिक 9.5, पुणे 9.9, मालेगाव 11.4, बारामती 11.4, सोलापूर 12.6, सातारा 13, कोल्हापूर 17, महाबळेश्वर 14.4, अहमदनगर 8.8,  उस्मानाबाद 12.1, जेऊर 11, माथेरान 14.8, सांगली 15.3, चिखलठाणा 10.8, नांदेड 12.2, परभणी 14.5, कुलाबा 17.5, सांताक्रूझ 14.8, ठाणे 18, रत्नागिरी 16.5 आणि नागपूर याठिकाणी 10.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. फेब्रुवारीत किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खालीच राहणार... भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात देशातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान सरासरी तापमानाच्या खालीच राहण्याची शक्यता आहे. केवळ पूर्वोत्तर भारतातील पूर्वेकडील भागात, दक्षिण भारतातील काही भाग आणि मध्य भारतातील दक्षिणपूर्व भागात किमान तापमान सामान्य किंवा सामान्य पेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, Weather forecast

    पुढील बातम्या