शिक्रापूर, 21 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा (Corona virus) संसर्ग वेगानं वाढत आहे. सध्या देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण (Corona patient death) आढळत आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातचं कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) अत्यंत घातक ठरत असून कुटुंबंच्या कुटुंब उद्धवस्त होताना दिसत आहेत. घरातील एका सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यास त्याचा संसर्ग घरातील इतरांना होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
अशातच दिवंगत आमदार रमेश वांजळे (MLA Ramesh wanjale) यांच्या दोन सख्ख्या मेव्हुण्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. 52 वर्षीय सतीश कुंडलिक गवारे आणि 47 वर्षीय दत्तात्रय कुंडलिक गवारे अशी या भांवडांची नावं आहेत. अवघ्या बारा तासांच्या अंतरानं या दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. घरातील दोन कर्ते पुरुष एकाकी गेल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या घराची सर्व जबाबदारी हे दोघं भावंडचं सांभाळत होते.
काही दिवसांपूर्वी दोन्ही भावांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर दोन्ही भावांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मोठा भाऊ सतीश गवारे यांच्यावर पुण्याजवळील उरळी कांचन याठिकाणी उपचार सुरू होते. तर लहान भाऊ दत्तात्रय यांच्यावर शिक्रापूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दोघांची अचानक प्रकृती बिघडल्यानं दोघांना पुण्यातील रुग्णलयात दाखल करण्यात आलं. दोघांवर उपचार सुरू असताना 17 मे च्या रात्री सतीश गवारे यांचं निधन झालं. तर तर दुसऱ्या दिवशी सकाळी 18 मे रोजी लहान भाऊ दत्तात्रय गवारे यांचंही निधन झालं.
हे ही वाचा-मोठी बातमी! कोरोनानंतर नाशिक Mucormycosis चा हॉटस्पॉट, 8 बळी तर 166 जण बाधित
स्वर्गीय आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे या मृत भांवांची सख्खी बहिण आहे. आपल्या भावांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनीही खूप धावपळ केली. पण शेवटी दोन्ही भावांनी कोरोना पुढे हार पत्करली. विशेष म्हणजे गवारे बंधुच्या वडिलांचही गेल्यावर्षी कोरोनामुळे निधन झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Death, Pune