प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ.. 'डेक्कन क्वीन'च्या जेवणात अळ्या आणि किडे

पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या 'दक्खनची राणी' अर्थात डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधील जेवणात अळ्या आणि किडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 11:20 AM IST

प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ.. 'डेक्कन क्वीन'च्या जेवणात अळ्या आणि किडे

पुणे, 22 ऑगस्ट- पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या 'दक्खनची राणी' अर्थात डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधील जेवणात अळ्या आणि किडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशाने ऑर्डर केलेल्या ऑम्लेटसोबत आलेल्या सॉस आणि ब्लॅक पिपर (काळी मिरी) पावडरमध्ये अळ्या आढळून आल्या. याबाबत प्रवासी सागर राजेंद्र काळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

IRCTCच्या कर्मचाऱ्यांची अरेरावी...

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील व्यावसायिक सागर काळे 19 जुलैला मुंबईहून पुण्याला परत येत असताना त्यांनी दिलेल्या ऑर्डर केलेल्या ऑम्लेटसोबत आलेल्या सॉस आणि ब्लॅक पिपर पावडरमध्ये अळ्या आढळल्या. काळे यांनी ही बाब डेक्कन क्वीनमधील 'आयआरसीटीसी'च्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, कर्मचाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची दखल न घेता अरेरावीची भाषा केली. तक्रार करण्यासाठी पॅंट्री कारमध्ये 'तक्रार पुस्तक' देखील उपलब्ध नसल्याचे काळे यांनी सांगितले. नंतर काळे यांनी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांच्या मार्गदर्शनानुसार बुधवारी (21 ऑगस्ट) पुणे रेल्वे स्थानकावर तक्रार दिली आहे. याबाबत “आयआरसीटीसी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार मिळाल्यानंतर तातडीने चौकशी करणार असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

काय म्हणाल्या रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा..

डेक्कन क्वीनसारख्या ऐतिहासिक गाडीच्या डायनिंग कारमधील खाद्यपदार्थात अळ्या आढळण्याचा प्रकार संतापजनक आहे. रेल्वे प्रशासन काय करते, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. खानपान व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या 'आयआरसीटीसी'ची यात मोठी चूक आहे. खानपानाचा दर्जा आणि प्रवाशांच्या तक्रारीबाबत त्यांच्याकडून लक्ष दिले जात नाही, ही बाबत निषेधार्ह असल्याचे रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा हर्षां शहा यांनी म्हटले आहे.

Loading...

राज ठाकरे ईडी चौकशीसाठी घराबाहेर पडतानाचा EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 11:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...