• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना, दरडीमुळे घर जमीनदोस्त, थोडक्यात बचावले 11 जण!

तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना, दरडीमुळे घर जमीनदोस्त, थोडक्यात बचावले 11 जण!

दरड कोसळून सीताराम पठारे यांच्या घराचे आणि किराणा दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

 • Share this:
  आनिस शेख, प्रतिनिधी मावळ, 23 जुलै : राज्यात मुसळधार पावसाने (maharashtra rain) थैमान घातले आहे. रायगड (raigad), रत्नागिरीमध्ये (ratnagiri) दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहे. तर पुणे जिल्ह्यातील मावळ (maval) तालुक्याचा शेवटचा टोक असलेल्या  तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी घरावर दरड कोसळल्याने घर जमीनदोस्त झाल्याची घटना समोर आली आहे. दैव बलवत्तर असल्याने घरातील 11 जणांचे जीव वाचला आहेत. तर, किल्ला पायथा परिसरात 300 मीटर लांब 10 फुट खोल जमीन खचल्याच निदर्शनास आल्याने गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दरड कोसळून सीताराम पठारे यांच्या घराचे आणि किराणा दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तुंग किल्ल्यावरून दरड कोसळली तेव्हा पठारे यांच्या कुटुंबातील अकरा जण शेतीच्या कामासाठी घराबाहेर गेले होते. '...त्यांनी मला मोलाच्या खूप गोष्टी शिकवल्या' पाहा कोण आहेत अमृता सुभाषचे गुरू त्यामुळे दरड पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही तर पठारे  सुद्धा दुकानात नसल्याकारणाने त्यांचाही जीव वाचला. डोंगर कड्यावरून मला मोठा दगड पडल्याने राहते घर तसच दुकान पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे.

  शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचा छापा; पाहा कारवाईचा Exclusive video

  यामुळे घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मावळमध्ये मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून  24 तासात तब्बल 207 मी.मी पावसाची नोंद झाली आहे.  मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.

  Cloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय? आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...

  रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
  Published by:sachin Salve
  First published: