Home /News /pune /

पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता, अजित पवारांनी दिली कबुली

पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता, अजित पवारांनी दिली कबुली

जम्बो वर अचानक जास्त पेशंट्सचा भार पडला. त्यामुळे व्यवस्था कोलमडली ही वस्तुस्थिती आहे.

पुणे 05 सप्टेंबर: पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगात वाढत आहे. त्याचबरोबर सोई-सुविधांवर ताण येत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात आज लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता आहे, काही चुका झाल्या आहेत अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले,ऑक्सिजन सिलेंडर जेवढे पाहिजे तेवढे मिळत माहीत हे वस्तूस्थिती आहे. अ‍ॅम्ब्युलन्सच्या तक्रारी मान्य आहेत. जम्बो वर अचानक जास्त पेशंट्सचा भार पडला. त्यामुळे व्यवस्था कोलमडली ही वस्तुस्थिती आहे. ससूनचा ऑक्सीजन तुटवडा प्रॉब्लेम झाला म्हणून जम्बोत पेशंट पाठवले. पुण्यात लॉकडाऊन उठवण्यावरून सीएमची वेगळी भूमिका होती पण पुणातील व्यापारी आक्रमक होते. म्हणून लॉकडाऊन उठवलं अशी माहितीही त्यांनी दिली. पुण्यातील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागली आग, घटनास्थळाला पहिला VIDEO अनेक लोकप्रतिनिधी कोरोना बाधीत झालेत. साथ वाढतेय हे वास्तव. संख्या लाखावर गेली असली तरी 82 हजार कोरोना मुक्त हे पण सांगितलं गेलं पाहिजे. सरपंच व्हायचं म्हणून काही कार्यकर्ते टेस्ट देईना हा सोशल प्रॉब्लम हे त्याला वाटतं लोक निवडून देणार नाही. कोरोना लपवून ठेवतात. परीक्षा घेण्यावरून भिन्न मतं आहेत. पुण्यात झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासर्व सर्व लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Ajit pawar, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या