माणुसकीचं दर्शन.. स्वत: नायब तहसीलदारांनी पाठीवर वाहून नेली अन्नधान्याची पोती

माणुसकीचं दर्शन.. स्वत: नायब तहसीलदारांनी पाठीवर वाहून नेली अन्नधान्याची पोती

निगडी येथील नायब तहसीलदार दिनेश तावरे यांनी परिस्थितीचे भान समजून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या धान्याची पोती स्वत: खांद्यावरून वाहून नेली.

  • Share this:

अनिस शेख, (प्रतिनिधी)

देहु, 13 ऑगस्ट- पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शासन पातळीवर ही मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. त्यातच निगडी येथील अन्नधान्य कोठारामधून पूरग्रस्तांना अन्नधान्याची पोती रवाना करण्यात आली आहे. ही अन्नधान्याची पोती स्वतःच्या खांद्यावर वाहून नायब तहसीलदार तथा परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी एक नवा आदर्श ठेवला आहे. अनेक शासकीय अधिकारी असे असतात की, ते त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतात. पण, निगडी येथील नायब तहसीलदार दिनेश तावरे यांनी पूरग्रस्तांना मदत पोहचविण्यासाठी कोणतीही दिरंगाई केली नाही. परिस्थितीचे भान समजून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या धान्याची पोती स्वत: खांद्यावरून वाहून नेली. आपलं पद बाजूला ठेऊन कर्मचाऱ्यांबरोबर ग्राउंड लेव्हलला काम करणारे असे अधिकारी क्वचित आढळतात. तहसीलदार दिनेश तावरे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.

मदतीला कोणताच धर्म नसतो...

कोल्हापूर आणि सांगलीमधल्या पूरग्रस्तांसाठी चारही बाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून मदत करण्यासाठी मानवता एकवटली आहे. पूरग्रस्त भागातील घरे, रस्ते, शाळा, अंगणवाडी यांच्यासाठी स्पेशल बजेट देऊन पुन्हा उभा करु, अशी घोषणा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडें यांनी केली आहे.

सांगली येथील पूरग्रस्तांना मदत पुरविण्यासाठी करमाळाकर एकवटले आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यासाठी करमाळ्यातील मच्छिमार सक्रिय झाले असतानाच प्रशासनासह विविध सामाजिक प्रतिनिधींनी केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर शहर परिसरातील नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सांगली येथील पूरग्रस्तांना या साहित्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.

लातूरातल्या मुस्लिम बांधवानी दिला निधी

बकरी ईदच्या निमित्ताने लातूरातल्या मुस्लिम बांधवानी जमा केला कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांसाठी मदत निधी दिला. सांगली जिल्ह्यातली तीन गावं वीज, पाणी, रस्ते दुरुस्तीसाठी दत्तक घेणार असल्याची जिल्हाधिकारी जि. श्रीकांत यांनी ईद निमित्ताने घोषणा केली आहे.

पंढरपूरकरांची मनाची श्रीमंती..

पंढरपूर येथील संतपेठ सात नंबर शाळा,अवतारी गल्‍ली येथील रहिवाशांनी कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांना प्रत्येक घरातून वर्गणी गोळा करण्यात आली. साड्या- कपडे लहान मुलांचे कपडे, पाण्याची बाटल्या, चिवडा या वस्तू देण्यात आल्या. पंढरपुरातील कष्टकरी, कामगार अशी लोकवस्ती असलेल्या भागातील रहिवाशांनी पुरग्रस्ताना पाठवलेली मदतीमुळे सर्व स्थारातून कौतुक होत आहे.

कोल्हापूर सांगली पुरात सापडलेल्या पूरग्रस्तांना दौंडच्या मुस्लिम समाजाने सामाजिक संदेश देत मदतीचा हात पुढे केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुराने कहर केला असताना मदतीसाठी सगळेच पुढे सरसावले आहेत. दौंडमध्ये ईदच्या निमित्ताने ईदगा मैदानावर नमाज पठणाच्या वेळी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत गोळा करण्यात आली. मदतीला कोणताच धर्म नसतो, हे यावेळी दिसून आले यावेळी पूरग्रस्तांसाठी मौलाना मोहम्मद रेहमतुल्ला यांनी नमाज पठण केले.

SPECIAL REPORT: 'राष्ट्रवादी पक्ष मराठा समाजाचा'; पवारांना पाठवलेल्या निनावी लेटरमागे कोणाचा हात?

Published by: Sandip Parolekar
First published: August 13, 2019, 9:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading