पुण्यात त्याने चाकूने केले चुलत बहिणीवर वार, वाचा नेमकं काय आहे कारण..

तुम्हाला सगळ्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आरोपीने दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 06:00 PM IST

पुण्यात त्याने चाकूने केले चुलत बहिणीवर वार, वाचा नेमकं काय आहे कारण..

पुणे, 5 सप्टेंबर:जमिनीच्या वादातून एका व्यक्तिने त्याच्या चुलत बहिणीवरच भर रस्त्यात वार केले. आरोपी पळून जात असताना त्याचा पाठलाग करणाऱ्या नागरिकांवर त्याने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. महर्षी नगरमध्ये ही घटना बुधवारी घडली. एका व्यक्तिने जीवाची पर्वा न आरोपीला पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले. विनोद मधुकर सराफ (वय-44, गुजराथ कॉलनी, कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील महर्षी नगरमध्ये एका व्यक्तिने जमिनीच्या वादातून चुलत बहिणीवर भर रस्त्यात वार केले. नंतर त्याने पळ काढला असता रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. परंतु त्याने आपल्याजवळील पिस्तूलने नागरिकांवरच गोळीबार केला. सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही. या दरम्यान, आलम शेख नावाचा तरुणाने जीवाची पर्वा न करता आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तुम्हाला जिवंत सोडणार नाही..

महर्षी नगर येथे आरोपीला पकडल्यावर पोलिस चौकशी केली. आरोपीचा चुलत भाऊ घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपीने पोलिसांनसमोरच त्याला धमकी दिली. तुम्हाला सगळ्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आरोपीने दिली आहे. दरम्यान, सराफ कुटुंब मुळचे जळगाव जिल्ह्यातील यावल येथील राहणारे आहेत. 15 वर्षांपूर्वी सराफ याच्या वडिलांनी गावकडील जमीन विकली होती. याच वादातून आपोपीने हा हल्ला केला. आरोपीला त्याच्या चुलत भावावर हल्ला करायचा होता. मात्र, भावा ऐवजी बहीणच समोर आल्याने आरोपीने चाकूने तिच्यावर वार केला. आरोपी विनोद सराफ हा एलएलबी झाला असून तो पुण्यातील कोथरूडमध्य होस्टेल चालवतो.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...