मराठी बातम्या /बातम्या /पुणे /जय बाबाजी! महाराज कीर्तनाला पोहोचावेत म्हणून पुणेकरांनी केली हेलिकॉप्टरची सोय, VIDEO VIRAL

जय बाबाजी! महाराज कीर्तनाला पोहोचावेत म्हणून पुणेकरांनी केली हेलिकॉप्टरची सोय, VIDEO VIRAL

कीर्तनाला येण्यास महाराजांना उशिर होऊ नये म्हणून आयोजकांसह भाविकांनीच यासाठी पुढाकार घेतला. यामुळे कीर्तनकार समाधान महाराज शर्मा हे सांगलीतून पुण्यात वाघोलीला हेलिकॉप्टरने ५५ मिनिटात पोहोचले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पुणे, 06 जानेवारी : सांगलीत एका कार्यक्रमात असलेल्या कीर्तनकार महाराजांना पुण्यातील कीर्तनात पोहोचण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली. कीर्तनाला येण्यास महाराजांना उशिर होऊ नये म्हणून आयोजकांसह भाविकांनीच यासाठी पुढाकार घेतला. यामुळे कीर्तनकार समाधान महाराज शर्मा हे सांगलीतून पुण्यात वाघोलीला हेलिकॉप्टरने ५५ मिनिटात पोहोचले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केज तालुक्यातले रामकथाकार समाधान महाराज शर्मा यांची सांगलीत रामकथा सुरू आहे. दरम्यान, समाधान महाराजांना दोन तासात पुण्यातील वाघोली इथे कीर्तन महोत्सवात पोहोचायचे होते. मात्र रामकथा संपण्याची वेळ आणि तिथून पुण्याला प्रवासात जाणारा वेळ यामुळे ते वाघोलीत वेळेत पोहचणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली.

हेही वाचा : विराट-अनुष्काने वृंदावनात घेतला स्वामींचा आशीर्वाद, मुलगी वामिकाचा VIDEO VIRAL

सांगली ते वाघोली प्रवासासाठी पाच ते सव्वा पाच तासांचा वेळ लागतो. गुरुवारी सायंकाळी सांगलीतील रामकथा पाच वाजता संपणार होती. तर वाघोलीत सातच्या सुमारास कीर्तन महोत्सवात पोहोचायचे होते. सांगलीतून कारने वाघोलीला दोन तासात जाणं अशक्य होतं आणि वाघोलीत पोहोचणं आवश्यक होतं. शेवटी वेळेचं आणि अंतराचं गणित पाहता या परिस्थितीत कीर्तनासाठी आयोजकांसह भाविकांनी हेलिकॉप्टरने महाराजांना वाघोलीला आणण्याचे ठरवले. त्यानतंर सांगलीतून समाधान महाराज शर्मा ५५ मिनिटात वाघोलीत इथं किर्तनासाठी दाखल झाले. त्यांचे व्हिडीओ आता व्हायरल होत असून सोशल मीडियावर त्यांच्या हेलिकॉप्टर राइडची चर्चा रंगली आहे.

First published:
top videos

    Tags: Pune, Sangli