Home /News /pune /

दगडूशेठ गणपती मंदिरात आज सकाळी पार पडला किरणोत्सव सोहळा, पाहा हा VIDEO

दगडूशेठ गणपती मंदिरात आज सकाळी पार पडला किरणोत्सव सोहळा, पाहा हा VIDEO

दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 16 मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश केला.

पुणे, 11 फेब्रुवारी : पुण्यातील (Pune) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) आज किरणोत्सव सोहळा पाहण्यास मिळाला. बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीच्या मूर्तीवर पडली आणि 'गणपती बाप्पा मोरया'चा एकच जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 16 मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात. गुरुवारी सकाळी मंदिरात उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभवला. सकाळी 8 वाजून 16 मिनिटे ते 8 वाजून 19 मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रींच्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणे स्नान घालत असल्याचा भास होत होता. 'माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा अनुभवायला मिळतो. गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने ही किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्याने गाभाऱ्यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. त्यामुळे भाविकांना हा सोहळा अनुभवता आला' अशी प्रतिक्रिया ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Dagdusheth ganpati, पुणे

पुढील बातम्या