या प्रकरणात काँग्रेसचीही उडी शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादात आता काँग्रेस पक्षानेही उडी घेतली आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी म्हटलं, आमचा किरीट सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला विरोध आहे. महापालिकेच्या इमारतीचा वापर विकासकामांच्या कार्यक्रमासाठी करावा, राजकारण करण्यासाठी नाही. काँग्रेसने आयुक्तांना पत्र दिलंय. कार्यक्रमाला परवानगी दिली तर काँग्रेस रस्त्यावर येणार असा इशाराही त्यांनी दिली आहे. वाचा : 'विरोधी पक्षात असताना कधीतरीच शिष्टमंडळ घेऊन राजभवनात यायचो, दररोज नाही' मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सणसणीत टोला किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल पुणे विमानतळावर दाखल होताच किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊतच्या मित्र परिवाराच्या पार्टनरची कंपनी आहे. या कंपनीला कंत्राट दिलंच कसं?, पीएमआरडीएकडे या कंपनीचे काहीही कागदपत्रे नाहीत, अर्जही नाही आणि तरी सुद्धा त्यांना कंत्राट दिलं. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या मदतीने कोविडमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, कारवाई व्हायलाच हवी. वाचा : "ठाकरे-पवार एकत्र पाहून भाजपला पोटदुखी, मविआ सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती" कोविड घोटाळा करणारी हेल्थलाईन लाईफलाईन कंपनीवर कारवाई करा. गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने 100 गुंड पाठवले होते, तक्रार मनपात होऊ दिली नाही. आता पाहतो कशी कारवाई करणार नाहीत असंही किरीट सोमय्या म्हणाले. सत्काराचं महत्त्व नाहीये. कोविड सेंटरचा भ्रष्टाचार झाला, एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता. कुणीही त्याविरोधात कारवाई केली नाही. किरीट सोमय्या मैदानात आहे, त्या कंपनीवर कारवाई करावी लागणार. संजय राऊत रोज उठून धमकी कोणाला देतात? त्या दुसऱ्या राऊतने 37 कोटींचा घोटाळा केला आता जेलमध्ये आहे. त्याच्याकडून जर पैसे संजय राऊतकडे पोहोचले असतील तर संजय राऊत यांना उत्तर द्यावंच लागेल असंही किरीट सोमय्या म्हणाले.भ्रष्टाचाऱ्यांच्या कर्दनकाळ मा. किरीटजी सोमय्या यांचा भव्य जाहीर सत्कार !
शुक्रवार, दि. : 11 फेब्रुवारी 2022, वेळ : दु. 3.30 वा. स्थळ : पुणे महानगरपालिका मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.@KiritSomaiya @jagdishmulikbjp @BJP4Maharashtra @ChDadaPatil pic.twitter.com/3Sa0KWuPdw — BJP Pune (@BJP4PuneCity) February 10, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Kirit Somaiya, Pune