मराठी बातम्या /बातम्या /पुणे /किरण गोसावी आणखी गोत्यात, दुबईवरून येताच महिला साथीदाराला अटक

किरण गोसावी आणखी गोत्यात, दुबईवरून येताच महिला साथीदाराला अटक

कुसुम गायकवाड ही दुबईहून पुण्यात दाखल झाल्यानंतर लष्कर पोलिसांनी मोठा शिताफीने तिला अटक केली आहे.

कुसुम गायकवाड ही दुबईहून पुण्यात दाखल झाल्यानंतर लष्कर पोलिसांनी मोठा शिताफीने तिला अटक केली आहे.

कुसुम गायकवाड ही दुबईहून पुण्यात दाखल झाल्यानंतर लष्कर पोलिसांनी मोठा शिताफीने तिला अटक केली आहे.

पुणे, 12 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी (mumbai cruise drug party case) अटकेत असलेल्या पंत किरण गोसावीच्या (Kiran Gosavi) पाय आणखी खोलात गेला आहे. नोकरीचे आमिष देऊन तरुणांना फसवल्या प्रकरणी  किरण गोसावीच्या आणखी एका महिला साथीदार असलेल्या कुसुम गायकवाडला (Kusum Gaikwad arrested) लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.

तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या किरण गोसावीच्या  अडचणी चांगल्याच वाढल्या आहे.  शिवराज जमादार या तरुणाला परदेशात नोकरीचे आमिष दाखवत 1 लाख 30 हजार रुपये उकळले होते. या प्रकरणी किरण गोसावी आणि कुसुम गायकवाड यांच्यावर पुण्यातील लष्कर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आज लष्कर पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी कुसुम गायकवाड हिला अटक केली आहे.  कुसुम गायकवाड ही दुबईहून पुण्यात दाखल झाल्यानंतर लष्कर पोलिसांनी मोठा शिताफीने तिला अटक केली आहे.  तिची चौकशी सुरू असून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पत्नीने घरात लावला सीक्रेट कॅमेरा; महिलेच्या मैत्रिणीसोबत पतीला रंगेहात पकडलं

याआधीही गोसावीच्या एका महिला साथीदाराला अटक करण्यात आली आहे. 2018 मध्ये पुण्यातील चिन्मय देशमुख (Chinmay Deshmukh) नावाच्या तरुणाची मलेशियात (Malaysia) नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली होती.

भाजपला जनताच मोडून काढेल, संजय राऊतांचा घणाघात

किरण गोसावीवर आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या 4 गुन्ह्यासह राज्यातील इतर भागात ही गोसावी याच्यावर 5 गुन्हे दाखल आहे. त्याच्याविरोधात लष्कर आणि वानवडी  पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन असे मिळून चार फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याआधी त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात 3 वर्षांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल होता.  ज्यांना ज्यांना किरण गोसावीने फसवले त्यांनी समोर येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.

First published:
top videos