• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुणे पोलिसांकडून किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक, कोर्टात करणार हजर

पुणे पोलिसांकडून किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक, कोर्टात करणार हजर

फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या (Kiran Gosavi) असिस्टंटला (Assistant) पुणे पोलिसांकडून (Pune Police) अटक करण्यात आली आहे.

 • Share this:
  पुणे, 18 ऑक्टोबर: फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या (Kiran Gosavi) असिस्टंटला (Assistant) पुणे पोलिसांकडून (Pune Police) अटक करण्यात आली आहे. शेरबानो कुरेशी (Sherbano Qureshi) असं या महिला असिस्टंटचे नाव आहे. 2018 मध्ये पुण्यातील चिन्मय देशमुख (Chinmay Deshmukh) नावाच्या तरुणाची मलेशियात (Malaysia) नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केलीय. शेरबानोला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. हेही वाचा- बुधवारपासून मुंबईतल्या महाविद्यालयात अशी असेल SOP किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांची दोन पथकं कार्यरत आहेत. महाराष्ट्रा बरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जात आहे. पालघरमध्येही दोन तरुणांचीही फसवणूक या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत एनसीबीनं क्रूझ ड्रग्ज पार्टीचा पदार्फाश केला होता. यावेळी (Cruise Drugs Party )शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करण्यात आली. या अटक प्रकरणात एनसीबीने (NCB) किरण गोसावी (Kiran Gosavi)ला साक्षीदार बनवलं. या किरण गोसावीविरोधात एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर केळवे सागरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हेही वाचा-  टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री शोधतायत नवी नोकरी, 'या' 2 करिअरवर आहे नजर केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे आणि आदर्श किणी ह्या दोन तरुणांना मलेशिया येथे नोकरी देतो असे सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडून दीड लाख रुपयेची रक्कम गोसावी यांनी बँक खात्यामार्फत घेतली होती. किरण गोसावी हा नवी मुंबईमधील के पी इंटरप्राईजेस या कार्यालयातून ही कामं करायचा. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष आणि आदर्श यांना गोसावीने मलेशियाला कामाला लावण्याचे आश्वासन दिले. तक्रारदार दोन्ही मुलांना तिकीट आणि व्हिसा दिल्यानंतर ते विमानतळावर गेल्यावर तिकीट आणि व्हिसा बनावट असल्याचं समजलं. विमानतळावर अधिकाऱ्यांनी त्यांनी बनावट कागदपत्र असल्याचं सांगितलं. त्यानंतर दोन्ही तरुणांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रारदार दोन्ही तरुणांकडे भक्कम पुरावे आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: