'मुळशी'चा आणखी एक पॅटर्न.. बैल पोळ्याच्या मिरवणुकीत बारबालांचे बीभत्स नृत्य

'मुळशी'चा आणखी एक पॅटर्न.. बैल पोळ्याच्या मिरवणुकीत बारबालांचे बीभत्स नृत्य

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत या प्रकारामुळे 'मुळशी'चा आणखी एक 'पॅटर्न' समोर आल्याची सर्वत्र चर्चा आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड,3 ऑक्टोबर: सर्व पितृ अमावस्येला बैल पोळ्यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान किन्नर बारबालांनी बीभत्स नृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर बारबालांनी बीभत्स नृत्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत या प्रकारामुळे 'मुळशी'चा आणखी एक 'पॅटर्न' समोर आल्याची सर्वत्र चर्चा आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हिंजवडी हद्दीतील मुळशी तालुक्यातल्या सूस गावातील ही घटना आहे. गावातल्या किशोर चांदेरे आणि संदीप चांदेरे या दोघांच्याविरुद्ध विनापरवाना बैलांची मिरवणूक काढणे,मिरवणुकीदरम्यान आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणे, धक्कादायक म्हणजे किन्नर बारबालांना बीभत्स नृत्य करायला भाग पाडणे तसेच यामुळे झालेल्या गर्दीमुळे सामान्य नागरिक आणि वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती हिंजवडी पोलीस स्टेशनचे निरकीक्ष यशवंत गवारी यांनी दिली आहे.

खरंतर बैल पोळा सण सर्वत्र पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. मुळशी तालुक्यातही हा सण दरवर्षी सर्व पितृ अमावस्येला मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरा केला जात होतो. मात्र यंदा सूस (मुळशी) येथे हा सण भलत्याच पद्धतीने साजरा करण्यात आला. बैल पोळ्यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत किन्नर बारबाला नाचवण्यात आल्या. बारबालांच्या बीभत्स नृत्यामुळे मुळशीच्या या पारंपरिक बैलपोळा ते बारबाला या नव्या पॅटर्नमुळे मुळशी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी महादेव जानकरांनी केलं औक्षण, पाहा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: October 3, 2019, 3:03 PM IST

ताज्या बातम्या