Home /News /pune /

Pune News: अखेर 9 दिवसांनी अपहरणनाट्य संपलं; 'तो' 4 वर्षीय चिमुकला सापडला

Pune News: अखेर 9 दिवसांनी अपहरणनाट्य संपलं; 'तो' 4 वर्षीय चिमुकला सापडला

Crime in Pune: बालेवाडी परिसरात अपहरण झालेला चार वर्षीय मुलगा आज 9 दिवसानंतर पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे भागात सापडला आहे.

पुणे, 19 जानेवारी: 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास पुण्यातील (Pune) बालेवाडी (Balewadi) हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून एका चार वर्षीय अल्पवयीन मुलाचं अज्ञातानं अपहरण केलं होतं. अपहरणकर्त्याने गोड बोलून संबंधित चिमुकल्याला दुचाकीवर बसवून घेऊन गेले होते. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. चिमुकल्याचं अपहरण झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांची अवस्था बेहाल झाली होती. अपहरण झाल्यानंतर अखेर 9 दिवसांनी संबंधित चिमुकला सापडला आहे. स्वर्णव सतीश चव्हाण (Swarnav satish chavhan) उर्फ डुग्गू असं या चार वर्षीय मुलाचं नाव आहे. तो 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या आपल्या एका लहानग्या मित्रासोबत शाळेत जात होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणानं त्याचं अपहरण केलं आहे. अपहरण होऊन आठ दिवस उलटल्यानंतरही अपहरणकर्त्यांचा खंडणीसाठी कोणताही फोन आला नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं होतं. आज अखेर नऊ दिवसांनी चिमुकला सापडला आहे. बालेवाडी परिसरात अपहरण झालेला चार वर्षीय मुलगा आज 9 दिवसानंतर पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे भागात सापडला आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या या मुलाला पोलिसांनी शोधून काढलं आहे. घटनेचा बोभाटा झाल्यानंतर घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी स्वत:च त्याची सुटका करून पळ काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. स्वर्णवचं अपहरण कुणी केलं? आणि 9 दिवस  तो कुठे होता? याबाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. हेही वाचा-मॅट्रिमोनियल साइटवरील इंजिनिअर निघाला भामटा; पुण्यातील महिलेला 62 लाखांचा गंडा पुणे पोलिसांकडून चिमुकल्याची चौकशी केल्यानंतर या अपहरण नाट्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तब्बल नऊ दिवसांनी स्वर्णव सुखरुप सापडल्याने कुटुंबाच्या जीवात जीव आला आहे. पोलिसांनी स्वर्णवची त्याच्या आई वडिलांशी भेट घडवून दिली आहे. हेही वाचा-मागाल ते देतो, काळजाच्या तुकड्याला सोडा, अपहरण झालेल्या लेकासाठी बापाची आर्त हाक विशेष म्हणजे स्वर्णवच्या वडिलांनी आपल्या काळजाच्या तुकड्याला सोडवण्यासाठी अपहरकर्त्याने मागेल ते देण्याची घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियावर 'मागाल ते देतो, माझ्या काळजाच्या तुकड्याला सोडा' (will give you whatever you want please release my son) असं आवाहन अपहरणकर्त्यांना केलं होतं. एवढंच नव्हे तर माझा मुलगा शारीरिकदृष्ट्या किरकोळ आहे. तो लगेच आजारी पडतो. त्यामुळे त्याला ताप किंवा खोकला आला तर, कोणतं औषध द्यावं, याबाबतची माहितीही अपहरण झालेल्या मुलाचे वडील सतीश चव्हाण यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून दिली होती. तसेच 'हवे तितके पैसे घ्या, मात्र माझ्या लेकराला सोडा' अशी आर्त विनवणी ते सतत करत होते. आज अखेर त्यांचा मुलगा सापडला आहे. अशी झाली भेट दोन दिवसांपूर्वी स्वर्णव पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात एका व्यक्तीच्या गाडीवर फिरताना दिसला होता. तेव्हापासून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तब्बल 22 पथक नेमून सगळीकडे नाकाबंदी केली होती. संशयित आरोपीला शोधण्यासाठी शहरातील सर्व cctv ची पाहणी करण्यात येत होती. नाकाबंदीमुळे पोलिसांची यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचणार,  या भितीतून अपहरणकर्त्याने आज दुपारी 1 च्या सुमारास पुनवळेतील लोटस हॉस्पिटलजवळील एका सोसायटीच्या गेटवरील एका वृद्ध वॉचमनकडे स्वर्णवला सोडलं. हेही वाचा-माहेरहून परत येताच सासरी केला शेवट, लग्नानंतर 7 महिन्यातच विवाहितेचं टोकाचं पाऊल यावेळी भेदरलेल्या स्वर्णवनं वॉचमनला आपल्या बाबाला फोन लावण्याची विनंती केली. मात्र स्वर्णवला फोननबर नीट सांगता येत नव्हता. मग तिथेच असलेल्या एका लिफ्टमनने हा प्रकार पाहिला आणि स्वर्णवकडे असलेल्या बॅगवरील नंबरवर  व्हिडीओ कॉल लावत स्वर्णवची ओळख पटवली. त्यानंतर स्वर्णवचे आई-वडील पुणे पोलिसांसह पूनावळे येथे दाखल झाले आणि मुलाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी संबंधित वॉचमनची चौकशी केली असता, अपहरणकर्त्याने आपला चेहरा पूर्णपणे लपवला होता, असं सांगितलं आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Kidnapping, Pune

पुढील बातम्या