मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

खेड शिवापूर टोल नाक्याचं आंदोलन पेटलं, आंदोलकांनी अडवला एक्सप्रेस वे

खेड शिवापूर टोल नाक्याचं आंदोलन पेटलं, आंदोलकांनी अडवला एक्सप्रेस वे

' लोकांचा पैसे द्यायला विरोध नाही. मात्र रस्त्याचं कामच झालेलं नसताना पैसे का द्यायचे असा त्यांचा प्रश्न आहे. नाका स्थलांतरीत नंतर करा आधी तो तातडीने बंद झाला पाहिजे.'

पुणे 16 फेब्रुवारी : पुणे सातारा रस्त्याचे 6 पदरी रुंदीकरणाचं काम अनेक वर्षे सुरूच आहे. काही ठिकाणी तर काम रखडले आहे. त्यामुळे रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली नको तसेच टोल नाका दुसरीकडे हलवावा याकरता सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने गेली अनेक वर्ष हे आंदोलन सुरु असून आज हे आंदोलन चांगलचं पेटलंय. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत सर्व गाड्या विना टोल सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर आंदोलकांनी मुंबई बंगळुरु एक्सप्रेसवे वर ठिय्या आंदोलन केलं. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याहून साताऱ्याकडे जाणारी वाहने चांदनी चौकातून कात्रज घाट मार्गे वळवली आहे.

या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर वाहतुकीचा प्रश्न अथवा कोंडी निर्माण होवू नये याकरीता कोल्हापूर बाजुकडून पुण्याकडे जाणारी वाहने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधिनियम कल 33 (1) (ब) नुसार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खालील मार्गाने वळविण्यात आली आहेत.

पप्पा तुम्ही दारू का पिता? असं विचारल्यामुळे बापानेच लेकीला जिवंत जाळलं

सातारा वाढे फाटा-वाठार स्टेशन-फलटण-लोणंद मार्गे पुणे, जोशी विहिर वाठार मार्गे लोणंद-निरा-जेजुरी मार्गे पुणे, खंडाळा-लोणंद मार्गे पुणे, शिरवळ-लोणंद मार्गे-निरा-जेजुरी मार्गे पुणे, वाई-शहाबाग फाटा-ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, वाई-एमआयडीसी फाटा मार्गे शहाबाग फाटा- ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, अजवड वाहने वाढे फाटा मार्गे वाठार-लोणंद मार्गे पुण्याकडे जातील.

केजरीवालांची 'फुकट'योजना राज्यात नको, पवारांनी काँग्रेसच्या मंत्र्याला फटकारलं

या आंदोलनाच्या घटनास्थळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आणि आंदोलकांशी चर्चा केली. सुळे म्हणाल्या, या प्रकरणाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा फोन आला होता. त्यांनीही काही सूचना केल्या आहेत. लोकांचा पैसे द्यायला विरोध नाही. मात्र रस्त्याचं कामच झालेलं नसताना पैसे का द्यायचे असा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे हा नाका स्थलांतरीत नंतर करा आधी तो तातडीने बंद झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

First published: