Home /News /pune /

खडकवासला चारही साखळी धरणं ओव्हरफ्लो, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

खडकवासला चारही साखळी धरणं ओव्हरफ्लो, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा


खडकवासला धरण तुडूंबं भरल्याने पाण्याचा विसर्ग (Water discharge from Dam) 6800 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

खडकवासला धरण तुडूंबं भरल्याने पाण्याचा विसर्ग (Water discharge from Dam) 6800 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

खडकवासला धरण तुडूंबं भरल्याने पाण्याचा विसर्ग (Water discharge from Dam) 6800 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

पुणे, 12 सप्टेंबर :  पुण्यात (pune) पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहे. खडकवासला धरण (Khadakwasla Dam) तुडुंब भरले आहे. त्यासोबतच साखळी धरणं 100 टक्के भरली आहे. खडकवासला धरणातून 6 हजार 800 क्युसेकने विसर्ग  (Water discharge from Dam) सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे. यंदा पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जुलै महिन्यातच खडकवासला धरण भरले होते. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व धरण भरली आहे. साखळी धरणं 100 टक्के भरली आहे. खडकवासला धरणातून 6 हजार 800 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे. आवश्यकतेनुसार विसर्ग वाढल्यास नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं अशी सूचना पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाने दिली आहे. नीरा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेस आमदाराच्या सूनेचा पती आणि सासरच्या मंडळीवर 1 कोटी खंडणीचा आरोप भाटघर हे ब्रिटिश कालीन धरण आहे.  भाटघर धरण रविवारी पहाटे 2 वाजता 100% भरलं. धरणाच्या 11 स्वयंचलित दरवाजातून 1171 घनफूट प्रती सेकंद विसर्ग चालू आहे. पावसाच्या प्रमाणात बदल  झाला तर नदीकाठावरील नागरिकांनी दक्षता घ्यावी लागेल. खडकवासला साखळी धरणाची एकूण साठवण क्षमता 29 टीएमसी आहे. आता चारही धरणं भरली गेली आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कानांचा त्रास 'या' घरगुती उपायांनी करा कमी आणि तासाभरात मिळवा आराम! खडकवासला धरण तुडूंबं भरल्याने पाण्याचा विसर्ग 6800 क्युसेक विसर्ग सुरू आहे.  विशेष म्हणजे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात खडकवासला धरण 100 टक्के भरलं होतं. यंदा मात्र तेच धरण 22 जुलैला 100 टक्के भरलं आहे.  त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि सर्व साखळी धरणं सुद्धा आता भरली आहे. त्यामुळे धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली   आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या