जगातले सर्वांत मोठे लस उत्पादक कोण? KBC च्या प्रश्नाचं उत्तर मिळेल पुण्यात

जगातले सर्वांत मोठे लस उत्पादक कोण? KBC च्या प्रश्नाचं उत्तर मिळेल पुण्यात

KBC मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. Covid काळात चर्चेत असलेलं हे नाव जागतिक औषध निर्माण क्षेत्रातही मोठं आहे.

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील महानायक Big B म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी काही महिन्यांपूर्वी केबीसी म्हणजेच 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या शूटिंगला हजेरी लावली होती; परंतु त्यानंतर त्यांना Covid-19 ची लक्षणं जाणवली. म्हणून चाचणी केली आणि ती दुर्दैवाने पॉझिटिव्ह आली. योग्य ती काळजी आणि औषधोपचार घेऊन अभिताभ बच्चन पुन्हा केबीसीच्या शूटिंगला हजार झाले आहेत.

KBC च्या 12 व्या सिझनमध्ये कोविड संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. भारतातील सर्वांत मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन करणारी कंपनी कोणती? त्याचे चार पर्याय देण्यात आले होते. ते पर्याय पुढीलप्रमाणे आहेत. भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट, इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड आणि बायोजन इंडिया. याचे बरोबर उत्तर हे सीरम इन्स्टिट्यूट आहे. ही कंपनी पुण्यात आहे. या फार्मास्युटिकल कंपनीचं नाव जगातल्या नामांकित कंपन्यांमध्ये घेतलं जातं. ते का घेतले जातं अशी काय खासियत आहे या कंपनीची ते पाहूया...

या कंपनीचा इतिहास

पारशी उद्योजक सायरस पूनावाला यांनी १९६६मध्ये पुण्यात ही कंपनी पुण्यात सुरु केली. सीरम इन्सिट्युट ऑफ इंडिया असं या कंपनीचं नाव असून ती  इम्युनोबायॉलॉजिकल ड्रग तयार करते. भारतातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी चालवणाऱ्या सायरस पूनावाला यांना 'व्हॅक्सिन किंग' या नावानी ओळखलं जातं. सीरम ही लस तयार करणारी भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी वर्षाला १३० कोटी इतक्या प्रमाणात लशींचं उत्पादन करते. या लशी भारतासह अनेक देशांमध्ये निर्यात केल्या जातात. या लशींचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत ज्यांना ताप येतो अशा सगळ्यांसाठी ही कंपनी लशींचे डोस तयार करते. बीसीजीचा डोस, पोलिओचे डोस तयार करते तसेच ऑर्डरप्रमाणे लशी तयार केल्या जातात.

संशोधनही रोगासंबंधी संशोधन करून ही कंपनी औषधं तयार करण्याचे  काम करते. २००९ साली स्वाईन फ्लूसाठी नाकातून दिलं जाणारं औषध याच कंपनीनी तयार केलं होतं. सीरम इन्स्टिट्यूटनी अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स मेडिकल स्कूलच्या सहाय्याने  अँटी-रेबीज एजंट तयार केला आहे. 2012 पासून कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळायला सुरुवात झाली.

हे आहेत सध्याचे सीईओ

अदर पूनावाला हे या कंपनीचे सध्याचे सीईओ आहेत. अदर पूनावाला हे सायरस पूनावाला यांचे पुत्र आहेत. 2011 साली अदर यांनी या कंपनीचा कार्यभार सांभाळायला सुरुवात केली त्यानंतर परदेशातदेखील या कंपनीची ओळख निर्माण झाली.

कोरोनावर लशीचा शोध सुरू

सध्या ही कंपनीनी कोरोनाच्या लशीच्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी  Astra Zeneca या कंपनीसोबत  कोरोनाच्या लशीवर संशोधन करत आहे. सीरमनी  Astra Zeneca या कंपनीसोबत लस उत्पादनासाठी करार केला आहे. हे संशोधन शेवटच्या टप्प्यात आलं आहे. या लशीचं नावही ठरवण्यात आले आहे.

ही  कंपनी किती लशी तयार करू शकते?

ऑक्सफर्ड प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लशींचे 10 कोटी डोस तयार करणार आहे. 50 टक्के डोस भारतासाठी असतील तर 50 टक्के हे गरीब आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील लोकांना देण्यात येणार आहेत. मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांना या लशीच्या एका डोससाठी 225 रुपये मोजावे लागतील.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 2, 2020, 11:43 AM IST

ताज्या बातम्या